पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-संर्ग १२. छिद्राप्रमाणे भासतें. फार मोठा प्रदेशही गायीच्या पावलासारखा वाटतो. व महाकल्प निमिषार्ध भासतो. कारण अमर्याद ब्रह्मसुखापुढे इतर सुखें व सर्वगत आणि नित्य ब्रह्माय्या अपेक्षेने सर्व देश, काल व वैभव तुच्छ भासतात. निःस्पृह चित्तामध्ये जितकी शीतलता असते तितकी चंद्र, हिमालयाची गुहा व केळीची अथवा चंदनवृक्षाची बाग यांमध्येही नसते. स्पहारहित मन जितके सुंदर दिसते तितका सुंदर पूर्ण चद्र, पूर्ण क्षीरसागर अथवा लक्ष्मीचे मुखही नाही. मेघमाला चद्राला व शाईचे ठिपके चुना लावलेल्या भिंतीला जसे दूषित करतात त्याप्रमाणे आशापिशाचिका पुरुषाच्या चित्ताला दूषित करिते. चित्तवृक्षाच्या आशानामक शाखानी दश- दिशांस व्यापून सोडले आहे. यास्तव त्यास धोनं तोडून टाकले म्हणजे तो चित्तमहावृक्ष नुस्ते खोड होऊन रहतो ( झणजे स्तब्ध ब्रह्म होतो.) तृष्णा-शाखा तोडून चित्तवक्षाचा नुस्ता खाब उभा राहिला झणजे त्याच्या खालचा धैर्य-रोपडा जोराने वाढतो. वैराग्य, जितेंद्रिय-च, द्वंद्वमहिष्णुत्व इत्यादि धैर्याने युक्त असलेल्या पुरुषाचे चित्त क्षीण झाले म्हणजे हे रामा, त्याला नाशरहित पद मिळते. राघवा, या आशारूपी चित्तवृत्तींना जर तूं वाढू दिले नाहीस तर तुला काही भय नाही. तुझें चित्त वृत्तिशून्य झालें की तू मोक्षमयी सत्तेस प्राप्त झालासच, असे समज चिंतन हीच वृत्ति. आशेन्या योगाने ती उद्भवते. याम्तव आशेलाच सोडलें ह्मणजे तुला सह- जच चित्तरहित होता येईल. कारण जो ज्या वृत्तीने युक्त असतो त्याचा त्या वृत्तीच्या अभावी क्षय होतो, असा नियम आहे. यास्तव चित्ताच्या शांतीकरिता त्याच्या वृत्तीचा क्षय कर. महात्म्या रामा, पुत्रादि सर्व इच्छा सोडून तूं मुक्तचित्त हो. मनातील खोड्याप्रमाणे बाधून टाकणान्या आशा नाहीशा झाल्यावर मुक्त कोण नाही होणार ? २१. सर्ग २२-बलीच्या आख्यानाचा आरंभ. पाताळाचे वर्णन बलीचे राज्य व त्याने वैराग्याने मेरुगंगावर केलेला विचार. श्रीवासिष्ठ-अथवा हे रघुवंशरूपी आकाशातील पूर्णचंद्रा, बलीप्रमाणे अकस्मात् विचारोदय झाल्यामुळे तुला अमल ज्ञान प्राप्त होऊ दे. श्रीराम-भगवन, सर्वधर्मज्ञ, आपल्या प्रसादाने मला हृदयान सर्व प्राप्तव्य प्राप्त झाले आहे. मी माता अमल पदी विश्राति घेत भाहे. हे विभो, माझ्या चित्तांतील तृष्णारूपी सर्व तम पार नाहीसे झालें जाहे. मी माता