पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६९८ वृहयोगवासिष्ठसार, त्या वनात यथेच्छ विहार करु लागले. काही दिवसांनी त्यांनाही निर्वाण प्राप्त झाले व तैलरहित दीपाप्रमाणे ते शांत झाले. रामा, याप्रमाणे आताची सख्याच करिता येत नाही. तेव्हां त्यांतील कोणाकरिता रडावें व कोणा- करितां हसावें ! यास्तव या सर्व तृष्णांचा त्याग करणे हाच खन्या शांतीचा उपाय माहे. उत्तरोत्तर अधिक विषयसंपादन करणे हा नव्हे. जशी जशी लांकडे घालावी तसा तसा अग्नि वाढत जातो. त्याप्रमाणे विष- यांचे चिंतन जसे जसे करावे तशी तशी चिंता वाढत जाते आणि लाकडे काढली असता अग्नि जसा शांत होतो त्याप्रमाणे विषयांचे चिंतन सोडलें की चिंताही क्षीण होते. ध्येय-वासनात्यागरूपी रथावर आरूढ होऊन सर्व भूतदयेनें उदार झालेल्या दृष्टीने दीन लोकाकडे पहात प्रकृत व्यवहार कर. रामा; हीच स्वच्छ, निष्काम व पीडाशून्य ब्राह्मी स्थिति आहे. या स्थितीला प्राप्त झालेला पुरुष व्यवहारामध्ये फारसा चतुर जरी नसला तरी मोहित होत नाही. विवेकनामक एक मुहृत् व परमार्थ बोधलक्षण बुद्धिरूपी एक प्रियसखी याना बरोबर घेऊन तं विहार कर. म्हणजे सकटा- मध्येही मोहित होणार नाहीस. ज्याने सर्व धनाचा परित्याग केला आहे व बाधवाना जणुं काय गचाच्या देऊन हृदयातून दूर केले आहे अशा स्व- धैर्यावाचून दुसरे कोणीही सकटातून सोडवीत नाही. वैराग्य, शास्त्रविचार व महत्त्वादि गुण याच्या योगाने मोठ्या यत्नाने मनाला विषयगर्तेतून वर काढावे. तुम्छ विषयाचा अभिलाप न करणे या महत्त्वाने पुत्र केलेल्या चित्तापासून जे फळ मिळतें तें त्रिभुवनाच्या ऐश्वर्यापासून व विविध रत्नानी भरलेल्या कोशापासूनही मिळणे शक्य नाही. मन पूर्ण(तृप्त) झाले की, सर्व जग अमृतरमाने परिपूर्ण होने. जोड्यानी पाय झाकून टाकले की, सर्व पृथ्वी चामन्याने मढविल्यासारग्वी होते. मन वैराग्याने पूर्ण होते, आशावश झाल्याने नव्हे. कारण त्यांच्या योगाने ते ग्रीष्मतूतील सरोवरा- प्रमाणे रिकामे होत जाते. ज्याचे चिन भाशावश झालेले असते त्याचे हृदय भगस्तिमुनीनं पिऊन सोडलेल्या सागराप्रमाणे रितें होते. ज्याच्या धर्म, ज्ञान, वैराग्य, शाति, दाति इत्यादि पुष्प-फल-पल्लवानी समृद्ध असलेल्या चित्तवृक्षावर तष्णानांवाची चपल मर्कटी नाचत नाही त्याचे-- मन, बुद्धि, महकार व चित्त या चार प्रकारच्या वृक्षांनी बनलेले-अतः- करण वन चांगलें शोभते. निःस्पृह पुरुषाला त्रिभुवन एकाद्या लहानशा