पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्म ११. भाऊ झाला आहेस. सूक्ष्म व शुद्ध बुद्धीने मला हे सर्व प्राक्तन ज्ञान झाले आहे. मीही अशा अनेक योनी आजवर पाहिल्या आहेत व ज्ञान- दृष्टीने मला त्यांचेही आज ज्ञान होत आहे. मी त्रिगर्तामध्ये पोपट, नदी. काठी बेडक, वनात लावापक्षी, विध्यारण्यांत मिल्ल, वंगांत वृक्ष, विप्यादी. वर उंट, हिमालयावर चातक, पौंडामध्ये राजा व सह्यपर्वतावरील गुहेत वाघ सालों. मी दहा वर्षे गिधाड होतो. पांच महिने सुसर झालों व शंभर वर्षे सिंह होऊन राहिलों आणि शेवटी श्रीशैलाचार्योचा पुत्र होऊन माता तुझा वडील भाऊ झालो आहे. बाळा, या जगाची ही अशी अवस्था आहे. बाजवर आमचे शतशः बांधव होऊन गेले आहेत. त्यांतील कोणाकोणांकरिता म्हणून रडावे, तें तरी सांग. वनांतील वृक्षाच्या पानाप्रमाणे असंख्य आप्त वारवार होतात व जातात. तेव्हा दुःख व सुख याला काही तरी प्रमाण आहे का? यास्तव सर्वाविषयी उदासीन होउन स्वग्छ चित्ताने राहू या. मनामध्ये स्थित असलेल्या अहं अशा प्रपचभावनेस सोडून तूं ब्रह्माच्या गतीस जा. बुद्धिमान् लोक सतत वेगाने होणाऱ्या या भ्रमणाविषयी मुळीच शोक न करितां निरभिमानाने व्यवहार करितात. यास्तव तूंही जरा-मरणशून्य आत्म्याला आठव, जन्म, दुःख, माता, पिता इत्यादिकातील तुझे काही नाही. तूं आत्मा आहेस. देहादि अनात्मा नव्हेस. या संसारयात्रेत अभिमा- नाने नानाप्रकारच्या चेटा करणारे अज्ञच सारबुद्धि ठेवतात भाणि ज्ञानी प्रेक्षक होऊन रहातात. रात्री प्रकाशनक्रिया करणा-या दीपांप्रमाणे ते या लोकस्थितीत कर्ते असल्यासारखे रहातात. हातातील आरसा, रत्न इत्यादिकांमध्ये मुखाचें प्रतिबिंब पडते; पण त्यांत ते स्वतः प्रवेश करीत नाहीत. त्याप्रमाणे महात्मे स्वात्म्यामध्ये अभ्यस्त कार्यांचे कर्ते होतात. पण त्यांत 'मी' असा अभिनिवेश करीत नाहीत. यास्तव बाळा, तूंही कामनामय कलंकशून्य, मननशील, साक्षात् व ससारसंभ्रमशून्य आत्म्याच्या योगानेच संतुष्ट हो १०. सर्ग२१-तृष्णापाशक्षय हाच मोक्ष. आशेनें चित्तवृत्ती उठतात निराम व मा. त्मपूर्ण पुरुषाला आपोआप मुक्ति मिळते. श्रीवसिष्ठ-राघवा, पुण्याने याप्रमाणे उपदेश केला असतां पावनास बोध झाला भाणि त्यानंतर ते दोघेही सिद्ध व मान-विज्ञान-पारग होउन.