पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वृहयोगवासिष्ठसार. बाधवही नाहीत, असे कळेल. जगामध्ये स्वभावतःच नाश नाही व तत्त्वबोध झाल्यावर तर तो मुळीच नाही. राजे व इतर धनिक लोक यांची ही जी छत्र-चामर-चंचल संपत्ति दिसत आहे, ते काही दिवस रहाणारे स्वप्न आहे. पारमार्थिक दृष्टया सत्य काय आहे, याचा विचार कर. हा गेला, मेला इत्यादि दुष्टी खऱ्या नव्हेत. त्या पापल्याच कल्पना आहेत १९. सर्ग २०-पुण्य पावनाच्या शोकाचा परिहार करण्याकरिता त्याच्या व आपल्या पूर्वजन्मांचे वर्णन करितो. पुण्य-पिता कोण, माता कोण, मित्र कोण व बांधव कोण ? मापल्या सकेतानेच हा बंधु-मित्र-पुत्र-देह-द्वेष-मोहरूप प्रपंचात्य रोग प्राणी उत्पन्न करतो. तो दृढ भावनेने एकाला बधु म्हणतो व एकाला शत्रु ह्मणतो. पण एका सदप सर्वगामी आत्म्यामध्ये ही भेदबुद्धि शोभत नाही. रत, मांस, व हाडे यांच्या संघातरूप अशा या देहांत, मी हा कोण, याचा तु आपल्या मनाने विचार कर. म्हणजे पारमार्थिक दृष्टीने मीही नाही व तूही नाहीस, हे तुला कळेल. मी पुण्य व तूं पावन हे मिथ्या ज्ञान आहे. पिता, माता, सुहृत्, बांधव, इत्यादिकांचे देहही भ्रांतिमात्र आहेत. त्यामुळे त्याच्या करितां शोक करणे उचित नव्हे. देहादि उपाधींहून भिन्न केलेल्या चिदाकाशासच जर तू

मी, तं, पिता, माता' इत्यादि समजत असशील तर माझा पिता,

माझी माता इत्यादि भेदघटित स्वत्वादि संबध अयुक्त आहे. लिंगशरीरच मी व बांधवादि आहेत म्हणून ह्मणशील तर आजपर्यंत अनेक जन्मामध्ये होऊन गेलेल्या आईबापांच्या शरीरांविषयीं शोक को करीत नाहीस? कारण निरनिराळ्या स्थानी मृग, हंस, वृक्ष, सिंह, मासे, वानर, कावळे, इत्यादि भनेक योनीमध्ये तुझे भनेक बोधय होते. तू दाशार्ण देशात कपिलवर्ण वन-वानर होतास. तुषार देशात राजपुत्र झालास. पुंड देशांत वनकापळा होतास. हैहय देशांत हत्ती होतास. त्रिगत गर्दभ होतास. शास्वांत कुत्रा होतास. तेथेच सुरुग्या झाडावर पक्षी होतास. विध्य पर्वतावर पिप्पल झालाम. मंदर पर्वतावरील एका वटवृक्षात लाकडातील किडा झालास. पुढे तेथेच कोंबडा झालास. कोसल देशांत ब्राह्मण, बंगात तीतिर पक्षी, व तुपारात मश्व होउन एका प्रामणाच्या यज्ञात पशु शालाम. बाळा, अशाच पाणखी बनेक योनीचा अनुभव घेऊन तूं माझा