पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ बृहद्योगवासिष्ठसार. जाणावे. यातील कोणत्या तरी एका भावनेचा सतत अभ्यास केल्यावाचून मानवाची विषम भावना क्षीण होणे शक्य नाही १८. सर्ग १९ -पुण्य के पावन यांच्या आख्यानाचा भारभ. पुण्याने पितृशोकात पाव नास केलेला उपदेश. __ श्रीवसिष्ठ-रघुनंदना, गंगेच्या तीरावरील दोघा मुनिपुत्रांचा संवाद मी तुला सांगतो. हा बंधु व हा नव्हे, या कथाप्रसंगाने मला आठवलेला तो पुण्यकारक इतिहास तू ऐक. या जबूद्वीपाच्या एका भागांत महेंद्र या नावाचा एक पर्वत आहे. त्याच्या सभोवार महा अरण्य असून त्यावरील कल्पगुमांच्या छायेत अनेक मुनी व किन्नर विश्रांति घेत असतात. त्याची शिखरें आकाशात ओळीने पसरलेली आहेत. मुनींनी त्याच्या एका रम्य रत्नमय शगावर स्नानपानादिकाकरिता गंगेला उतरविले होते. त्या गगा- प्रवाहाच्या तीरी साक्षात् तपच असा एक दीर्घतपा नावाचा मुनि होता. त्याला चंद्रासारखे सुंदर दोन पुत्र होते. त्यातील एकाचे नाव पुण्य व दुसन्याचे पावन होते. ते दोघेही हस्पतीच्या कचासारखे मोठे बुद्धिमान होते. एफ भार्या व ते दोघे पुत्र ासह तो मुनि फळझाडानी व्याप्त झालेल्या त्या गंगातीरावर रहात असे. काही दिवसांनी त्यातील गुणांनीही श्रेष्ठ असलेला पुण्य नावाचा ज्येष्ठ पुत्र ज्ञानी झाला व पावन अर्ध्या फुटलेल्या पुष्पाप्रमाणे अर्धज्ञानी होता. त्याचे ज्ञान अजून परिपूर्ण झाले नव्हते. काही दिवस लोटल्यावर दीर्घतपा मुनि जराजर्जर झाला व काळ जवळ आल्यामुळे तो ससारावरील आसक्ति सोडून व पक्षी जमें घरटें सोडतो त्याप्रमाणे भौतिक शरीराचा त्याग करून परलोकी गेला. एकादा मारवाही आपल्या डोक्यावरील भार जसा खाली टाकतो त्याप्रमाणेच त्याने ते भारभूत शरीर गगातीरी टाकले आणि तो महाज्ञानी शात चितदाम जाऊन पोचला. नतर त्याप्या भार्येनेही, मुनीचा देह प्राणापानरहिन होऊन भूमीवर तुटलेल्या कमलाप्रमाणे, म्लान होऊन पडला आहे, असे पाहून त्यानेच दिलेल्या व फार दिवस अभ्यासिलेल्या योगयुक्तीने आपली तनु सोडली. टोकांना अदृश्य झालेली ती पतिव्रता, अश्य झालेली चद्रप्रभा जशी चंद्राच्या मागोमाग जाते तशी मापस्या पतीच्या मागोमाग गेली. याप्रमाणे माता व पिता यांचा देहान्त एकाचवेळी झाला असतां विवेकी पुण्य न्यम-