पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपरामप्रकरण-सर्ग १८. १९१ भाशा, वासना, व अनुराग सोड. माणि बाहेरून केवळ शरीरचेष्टा कर. उदार, सुंदर आचारवान् कोणाचा बुद्धिभेद न करितां व्यवहार कर. णारा हो. सर्व संसार-दशांचा विचार करून व अतुच्छ परम पदाचा आश्रय करून लोकांमध्ये वाग. आंतून माशा सोडून बाहेरून माशावान् मसल्याप्रमाणे, भांतून शीतळ व बाहेरून तप्त असल्याप्रमाणे, आतून वेगशून्य व बाहेरून मोठा वेगवान् असल्याप्रमाणे आणि भातून अकर्ता । बाहेरून कर्ता असल्याप्रमाणे तूं लोकामध्ये व्यवहार कर. सर्व भावाचे तत्व तुला कळले आहे. यास्तव कृत्रिम हर्ष, कृत्रिम उद्वेग व कृत्रिम आरंभ तूं यथेच्छ कर. अहंकार सोडून, बुद्धीला स्थिर ठेवून, आशापाश तोडून व सर्व वृत्तींमध्ये समभाव ठेवून बाह्य कार्य कर. देहवानाला वस्तुतः बंध नाही व मोक्षही नाही. ही सर्व भ्राति आहे. कारण एक व सर्व. गामी आत्म्याला बंध कसा असणार व बंधच जर नाही तर माक्ष कोणाला होणार ? तुला सूक्ष्म दृष्टीने तत्व कळलें आहे व तूं निरहंकारही झाला आहेस. यास्तव आता तू आकाशाप्रमाणे निर्मल रहा. शरीरसंबंधी जनाविषयीं सुखी किंवा दुःखी होऊ नको. कारण जग, आत्मा व तं यांच्या स्वभावाचा विचार केला म्हणजे सुख व दु.ख याना अवकाशच रहात नाही आणि सुखदुःखच करावयाचे म्हटल्यास त्याला सीमा नाहीशी होईल. कारण संसाराचे स्वरूप सदा आधियुक्त आहे. त्या सर्व शक्ति- मानाचा हा सर्व खेळ आहे. कोण कोणाचा बंधु व कोण कोणाचा रिष. अथवा सर्वच सर्वांचे सर्व आहेत. सर्व सर्वेश्वराच्या इछेने होते. हा जगत्प्रवाह असाच चालणार. खाली असलेले जीव वर जाणार व परचे खाली येणार. जीवांचा स्वर्गातून नरकात, नरकातून स्वर्गात । एका योनीतून दुसऱ्या योनीत जाण्याचा क्रम एकसारखा चालला आहे. भाज धार असतो तो उद्या कृपण होतो व कृपण धीर होतो. संसारचक्रांत एक- रूप कोठेच आढळत नाही. हा आपला व हा परका, हा बंधु पहा शत्र या भावनाही अस्थिरं आहेत. यास्तव राघवा, वासनाभराने भात न होता सुखाने व्यवहार कर. वासनाक्षय जसा जसा दृढ होत जाईल तसा तसा तुझा व्यवहारही कमी होऊं लागेल. एकतर सर्व माझे माहे मी सोचा आहे, असे समजावे किंवा मी कोणाचा नन्हे व माझे कोणी नये, असे