पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ बृहद्योगवासिष्ठसार. तिचाच इद्रियावर परिणाम होतो व त्याप्रमाणे त्याचे कायिक वचाचिक कर्म सुरू होते. त्याच्या मनातील अभिप्राय एक व कर्म दुसरे; 'असे कधीही होत नाही. गावास जाण्याची 'ज्याची इच्छा असते तो तदनुकूल व्यापार करितो व गांवीस 'आती आणि नमैरास जाण्याची ज्याची इच्छा असते तो मगरास जातो, तात्पर्य ज्याची जशी वासना असते त्याप्रमाणे तो प्रयत्न करिती व फळ मिळवितो. तीव्रवेमामुळे म्हणजे एकाद्या फळाच्या अति अभिलाषा- मुळे पूर्वी जे कर्म केलेले असते, त्या कर्मासच दैव असें म्हणतात, हे मी मागेही एकदां सुचविले आहे.तात्पर्य, एका प्रकारच्या कार्मासच दैव म्हणतात हे भिन्न तत्त्व नाही. घट, कलश, कुभ या शब्दाप्रमाणे तो एक कर्माचाच पर्याय शब्द आहे. कारण, ते काहून भिन्न आहे, असे म्हटल्यास प्रमाणाच्या योगाने त्याची सिद्धि करिता येत नाही. का पुरुषाची कर्मे वर सागि- तल्याप्रमाणे वासनामय असतात. वासना मनोमय, असते. म्हणजे मना- चाच तो एक विकार अमतो, आणि मन पुरुषाहून भिन्न नाही. कारण, ती त्याचीच शक्ति आहे. वयाचाच परिणाम आहे. कोणताही विषर्त परिणाम उपादान कारणाहून निराळा नसतो पुरुष तर वस्तुतः निर्विकार चैतन्यरूप आहे. तेव्हा स्वतत्र मनाच्या अभावी वासनेचा अभाव तिन्या अभावी कर्माचा अभाव व कर्माच्या अभावौं कर्मरूप दैवाचाही अभाव सिद्ध होतो. यास्तव, बा रामा, सत्, असत्, चित, जड, भेद. अभेद इत्यादि रूपाने तत्त्वत. निश्चय, न कुरिता येण्यासारिख्य मनाशी तदात्म्य पावलेल्या पुरुषासच मन, चित्त, वासना, कर्म, दै- इत्यादि -सज्ञा प्राप्त होतात. यावरून, पुरुष स्वतत्र आहे; तो देवाधीन नाही तो दृढ भावनेने जसा जसा प्रयत्न करतो तसे तसे फळ भोगितो, हे तुल वागले समजेल. अकस्मात् एकादी गोष्ट घडते असे जे आपणास वाटर असते तो भ्रम आहे सृष्टीत कारण व कार्य याचाच सर्व विलास 'चालला आहे. काही कार्याचे कारण जैवळ असते व एकाद्याचे दूर असते सकुचित दृष्टीच्या लोकास दूरचे कारण दिसत नाही व त्यामुळे ते त्याच्य कार्यास अकस्वान्त प्राप्त झालेले, असे हाणतात. तात्पर्य हे सघवा, पौरुषानेर सर्व प्राप्त होते, मसेलू-निःशकपणे जाण.