पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १७. ६९१ हे सर्व आहे, हा तिसरा निश्चयही मोक्ष देतो. देहादिरूप मी व ही जड सृष्टि अशी दोन्ही शून्य आहेत, हा चवथा निश्चय असून तोही मोक्ष देतो. तात्पर्य रामा, या चार निश्चयांतील पहिला प्राण्याला बद्ध करतो व शुद्ध भावनेमुळे उत्पन्न झालेले बाकीचे तीन मोक्षोपयोगी आहेत, असे सांगितलेले आहे. कारण यातील पहिला निश्चय असला तरच तृष्णा बंध उत्पन्न करूं शकते. यास्तव वस्तुतः तो निश्चयच बंधाचे खरे कारण आहे. ज्यांच्यामध्ये शुद्ध तृष्णा आहे, असे पुढचे तीन निश्चय स्वच्छ असून ते जीवन्मुक्तामध्ये रहातात. त्यांतूनही शेवटचा निश्चय मला फार आवडतो. कारण आत्म्याचा महिमा खाली, वर व बाजूला व्यापून रहाणारा आहे. त्यामुळे सर्व आत्माच आहे, या निश्चयाने कोणाचीही मति खिन्न होत नाही. या शिव ईशान पुरुषालाच वादी शून्यादि अनेक नावे देतात. एका परमार्थस्वरूप दृष्टीने जग व्याप्त आहे. भ्रातिबुद्धीनें नव्हे. पाताळापासून सत्यलोकापर्यंत व त्याच्या पलीकडेही आत्मा भरला आहे. एवढ्यासाठीच सर्व सत्य, सर्व नित्य व सर्व मिथ्याशून्य आहे. समुद्रात सर्व पाणीच; दुसरे (तरगादि) काही नाही. कडी, बाहुभूषणे, भांगठ्या, इत्यादि सर्व सोनेच दुसरे काही नाही. परमात्ममयी अद्वैत शक्तिच द्वैताद्वैत भेदानी विकास पावते. रामा, भापले किंवा दुसन्याचे कार्य सिद्ध झाले किंवा न झाले तरी तूं सुखी व दुःखी होऊ नको. तं ब्रह्माप्रमाणेच भातून अद्वैतपर व बाहेरून द्वैतपर होऊन रहा. विषयभावनेने भयंकर संसार-भूमीत धक्के खाऊ नकोस. हे महात्मन् , द्वैत संभवत नाही. कारण तें चित्तमय आहे. त्याचप्रमाणे आत्म्यामध्ये एकत्व हा संख्यागुणही संभवत नाही. कारण त्याला एक मणणे, हे सुद्धा द्वित्वादिकाच्या व्यावृत्तीकरितांच होय. तस्मात् ते तत्त्व म्हणजे बोलता न येण्यासारखें व चिंतन करता न येण्यासारखे असे काही नाहे. से सदा निर्विकार आहे. हे सर्व विज्ञानमात्र असते. सर्व शांत तत्व पस रलें आहे. ते परम अमृत, अनाय, सर्व भासोस भासमान करणारे, मजर मज, अचिंत्य, निष्कल, साधनशून्य, जीवशक्तीचे जीवन व सर्व कारणा कारण आहे. राघवा, तूं, आम्ही व हे सर्व जग सदा प्रम आहे, बस तुमा मात दृढनिश्चय असू दे १७.