पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरम-सर्ग १६. ६८९ मणजे काय, ते सांगतो. सर्व जग सम ब्रह्ममय आहे, असे साक्षात् जाणन व भूमिकांचा क्रमाने अभ्यास करून ज्या वासनात्यागाने पुरुष निर्मम, निरहंकार व निर्विकल्पसमाधिस्थ होतो अथवा प्रारब्धक्षय झाल्यामुळे सर्वथा देहत्याग करतो तो ज्ञेयवासनात्याग होय. अहंकारमयी वासना सोडून जो लोकसंग्रहोचित व्यवहार करीत रहातो तो ध्येयसत्यागी जीव. न्मुक्त होय. मूल भज्ञानासह वासना सोडून जो शांत झालेला असतो म्हणजे वरील ज्ञान्याप्रमाणे व्यवहारही करीत नाही तर चिन्मात्रप्रधान होऊन रहातो, तो ज्ञेयसत्यागी होय. जनकादिक महात्मे व जीवन्मत्त सुजन ध्येय-वासनात्याग करून व्यवहाररूपी लीला करीत रहातात. ज्ञेय. वासनात्याग केलेले महात्मे समाधि लावून अथवा देहत्याग करून ब्रह्मा- मधे रहातात. राघवा, हे दोन्ही त्याग एकसारखेच मुक्तपदी स्थित आहेत. दोन्ही ब्रह्मतेस प्राप्त झाले आहेत व दोन्ही दुःखशून्य आहेत. त्यांतील आयत्यागवान् पुरुष समाधीमये आरूढ असतो. म्हणून त्याला युक्तमति म्हणतात. ध्येयत्यागवान् समाधीपासून व्युत्थान पावून व्यवहार करितो. यास्तव त्याला अयुक्तमति म्हणतात. पण ते दोघेही अविद्यामल- रहित ब्रह्मामध्येच स्थित असतात. त्यांच्यामध्ये जर काही विशेष असला तर तो एवढाच की, एकाचा देह व्यवहार करीत असतो व दुसन्याचा समाहित असतो. एक देहयुक्त असूनही मुक्त व निःशोक असतो व दुसरा देहाचाही त्याग करून मुक्त होतो. (आता व्यवहार करणान्या मुक्ताची लक्षणे सागतात.-) न्याच्या त्याच्या योग्यसमयी सुखें व दुःखें येऊ लागली असतां जो हृष्ट व म्लान होत नाही तो मुक्त होप. इष्ट वस्तूविषयी राग (प्रेम ) व अनिष्ट वस्तूविषयी द्वेष ज्याच्याम नस- तात, जो निद्रित असल्याप्रमाणे व्यवहार करितो, ज्याचे ग्राह्य व त्याज्य हे भाव पार नाहीसे झालेले असतात, अहं व मम या कलना ज्याच्या क्षीण शालेल्या असतात व भय, क्रोध, कार्पण्य इत्यादि दृष्टीनी जो मुक्त असतो तोच जीवन्मुक्त होय. जाग्रस्कालीही ज्याचे चित सुषुप्तीप्रमाणे वृचिशून्य असते व पूर्ण बंद्राप्रमाणे ज्याचे मन सदा माहादसंपन असते साला यालोकी जीवन्मुक्त म्हणतात. श्रीवाल्मीकि-मुनिवसिष्ठ इनके संगत माहेत तोच दिवस गुपब