पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८८ बृहद्योगवासिष्ठसार. जराही करीत नाही. या हृदयस्थ अमंगल तृष्णेनेंच भगवान् विष्णूला वामन केलें. हीच प्राण्यांस भटकावयास लावते. यास्तव या सर्पिणीच्या वाटेलाही जाऊ नये. तृष्णेन्या योगानेच वायू एकसारखे वहातात, पर्वत उभे रहातात व धरा (पृथ्वी) धारण करते. तृष्णेनेच त्रिभुवनास स्थिर केले आहे. सर्व लोक-यात्रा तृष्णारूपी दोरीत ओवलेली आहे. दोरीच्या पाशातून सुटतां तरी येते पण या तृष्णापाशांतून मोकळे होतां येत नाही. यास्तव राघवा, तू तृष्णा सोड. संकल्प सोडल्यानेच निचा क्षय होणे शक्य आहे. मन नाही हे तुला मी नुक्तेंच सप्रमाण सांगितलें आहे. मग मनाच्या अभावीं तृष्णाप्रसक्ति कशी होणार! हा तं' हा मी' हीच दुराशा मनात धरूं नकोस. अनेक दु.खास प्रसवणारी अनात्म- भावना तूं सोडलीस की, तुझी गणना ज्ञान्यामध्ये होऊ लागेल. अहं- भावनामयी तृष्णेला सोडून हे कुशल रामा, तूं ब्रह्म हो १५. सर्ग १६-येय व नेय वामनान्याग. जीवन्मुक्त व विदेहमक्त याचे लक्षण, श्रीराम-प्रभो, अहकार-तृष्णेचे प्रहण करू नको, हे आपले वचन स्वभावतःच गभीर आहे. कारण मी अहकाराला सोडले की माझा देहही जाणार ! मोठया विस्तृत खोडाकडून वृक्ष जसा धारण केला जातो त्या- प्रमाणे अहकाराकडून हा देह धारण केला गेला आहे. त्यामुळे महका. राचा क्षय झाला की, देहाचाही अवश्य क्षय होणार, हे ठरलेलेच आहे. कारण करवतीने मूळ कापल्यावर महावृक्ष उभा कसा रहाणार ? यास्तव भी अहंकाराला सोडूं कमा व जिवत राहूं कसा ते मला सागा. श्रीवमिष्ठ-कमलनयना, वामनायाग दोन प्रकारचा सागितला आहे. एक ज्ञेय व दुसरा ध्येय. त्यातील ध्येय वासनात्यागाचे उपपादन प्रथम करतो. या व्हेंद्रियादि व अनपानादि पदार्थाचा मी आहे, हे माशें जीवित आहेत, याच्या वाचन मी कोणी नाही व माझ्यावाचून हे नाहीत, असा जीवाविषयी तित्या आत निश्चय करून मनासह त्याचे पृथकरण केले असतां मी चिदान्मा अमून याचा मामा वस्तुतः काही सबध नाही, असे समजणे व व्यवहारसमयी त्याचेच अनुसंधान करणे हा पहिला ध्येय वासनात्याग आहे. जीवन्मुक्तांच्या प्रारब्ध प्राप्त व्यवहारसमयीं या ध्येय- -न्यासनात्यागाचाच विद्वान् लोक उपयोग करीत असतात. भाता समाधि- समयों व विदेह कैवल्यावस्थेत असणारा शानबाधित शेय बासनात्याग