पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. ज्यांनी चित्ताला जिंकलेलें नसते त्यांना सर्व दिशा दुःखद झालेल्या असतात. त्यामुळे भूमीवरील धूळ सर्वथा झाडणे जसें अशक्य त्याप्रमाणे त्यांच्या दुःखाचे परिमार्जन करणे अशक्य आहे. पण हे रघुनंदना, ज्यानी आपल्या चित्ताचे चांगले नियमन केले आहे त्याच्या दुःखाच्या निवार- णाविषयी आत्मज्ञानें अवश्य विचार करावा... असो; हे राघवा, याप्रमाणे मनाचा वस्तुतः अभाव आहे. यास्तव त्याची कल्पना करू नको. या कल्पित मनामुळेच तुझा सर्व घात होत आहे. जोपर्यत तुला आत्मतत्त्वाचे भान नव्हते तोपर्यत तुझा मनोव्यात्र गुरगुरत होता, तें ठीकच आहे. पण भाता तुला आत्मतत्त्वाचे स्मरण झाले आहे व संकल्पामुळे मन वाद्धि पावते, हेही तुला कळले आहे. यास्तव आता यापुढे त्याला जिवत ठेवू नकोस. या दृश्याचा भाश्रय केलास की, तूं सचित्त व बद्ध झालास म्हणून समज. तूं दृश्याला जर सोडलेंस तर तत्काल अचित्त व मुक्त होशील. या त्रिगुणात्मक मायामय गुणसंघाचा आश्रय तू बंधाकरिताच केला आहेस, यास्तव त्याला सोड. आंतर व बाह्य दृश्य नाहीच, असें ध्यान करीत तू पर्वताप्रमाणे अचल रहा. तुझा आत्मा अति स्वच्छ आहे. यास्तव अहं व हे ही द्वित्वमयी कल्पना सर्वथा सोडून बाकी तूं जसा रहाशील तसाच मुस्थिर हो. अहं हा द्रष्टा व इद हे दृश्य याचा त्याग केला म्हणजे साक्षि दृक रहाते. त्या आत्म्याचे तूं ध्यान कर. भोज्य व भोक्ता यास सोडून केवल स्वाद घेणाऱ्या शक्तीचे ध्यान करीत रहा. भव-भावनारहित व भावाभावदशाशून्य अशा आत्म्याचीच भावना करीत तुं आत्मस्थ हो. तू आत्मसत्तेला विसरून विषयाची जेव्हा भावना करतोस तेव्हा अति दुःखद चित्ततेस प्राप्त होतोस. स्वरूपज्ञान-युक्तीने या चित्तता. नामक शखलेस तोडून हे महावीरा, तृ चित्तबिळातून स्वात्मसिंहाला सोडीव. आत्म्याहून भिन्न पदार्थाची कल्पना करणे म्हणजे महादुःखात पडणेच आहे. हा सर्व आत्माच आहे, अशी सविद् आतल्या आत उत्पन्न झाली म्हणजे त्रिपुटी पार नाहीशी होते. मी आत्मा जीव आहे असे समजले की चित्ताचा उदय झाला व त्यामुळे अनादि-अनंत दुःख बोडक्यावर बसलेंच. पण मी ब्रह्म आहे व जीवनामक ब्रह्मेतर सत्ता सत्य नव्हेत, असा स्थिर निश्चय झाला की, चित्ताचा उपशम व परम सुख भापोआप होते. मनःसर्प शरीरामध्ये जोवर स्थित आहे तोवर महद्भय असते व त्याला