पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ११. १८५ ताकडून पराभूत होतात. वन पर्वतांचा चूर उडविते. ते वज इंद्राच्या धीन असते. इंद्राला विष्णु त्रैलोक्याचा अधिपति करतो व तोच विष्णु व शरीरांत जीव होऊन मरेपर्यंत दुःख भोगतो. मोठमोठ्या शरीरांनी क व विद्या आयुधे इत्यादिकांनी सपन्न असलेल्या प्राण्यानाही उका, सा, डास, ढेकूण, गोचिड्या, व्याघ, सिंह इत्यादि खातात. सारांश प्रमाणे हे प्राणिजंगल आधिभौतिक दुःखांनी छिन्न-भिन्न होऊन येथे ची गणनाही केली नाही अशा आध्यात्मिक व आधिदैविक दुःखांनी ष्टप्राय झाले आहे. प्राणी एकमेकाचा मळ याप्रमाणे सतत खातात थवा उत्तरकालाकरितां त्याचे रक्षण करितात. नानाप्रकारच्या भूतजाती कसारख्या नाश पावत असून त्या सतत उत्पन्नही होत असतात. जलाच्या कोशामध्ये मत्स्य, मकर इदि जलचर, भूमीत विंचु, साप कडे इत्यादि अंतरिक्षात आकाशपक्षी या नावाचे क्षुद्र पक्षी, वनांमध्ये ग, व्याघ्र, सिह इत्यादि पशू, प्राण्याच्या अंगावर उवा वगैरे, काष्टामध्ये णा इत्यादि लांकडे पोखरणारे किडे, पाषाणामध्ये बेडुक, किडे इत्यादि, विष्ठेमध्येही नानाप्रकारचे किडे प्रतिक्षणी अनत उत्पन्न होत असतात. व्हा आता या सतत होणा-या उत्पत्ति-नाशाविषयी कारुणिक पुरुषानें सावें की रडावें ? उत्पत्ति व विनाश यानी भरलेल्या या ससाराविषयी [तुष्ट होणे युक्त नव्हे व दुःखी होणेही प्रशस्त नव्हे. वृक्षांच्या पानाप्रमाणे ताच्या असंख्य परंपरा पुनः पुनः होऊन पुनः पुनः मरत असतात. ण वस्तुस्थिति अशी असतांना जो मूढ मी दयावान् आहे, असा अभि- न धरून मूर्तीच्या दुःखांचे परिमार्जन करण्यास प्रवृत्त होतो तो धापल्या डोक्यावरील छत्रीच्या योगाने सर्व आकाशातील उन्हाचे निवारण करण्यासच तयार होतो, असें मी समजतो. यास्तव राघवा, तिर्यक् प्राण्या- पारख्या प्राकृताना उपदेश करूं नये. कारण वनामधे वाळलेल्या झाडा- पुढे बसून कथा सांगण्यात कोणता लाभ आहे ! ज्यांचे मन विषयांमधे विस्तार पावलें आहे असे मानव व पशू यांच्यामध्ये अंतर ते कोणतें: पशुंना जसे लोक दोरीने भोढतात त्याप्रमाणे विषयी जन मनाकडून खेचले जातात. आपल्याच चितरूपी चिखलात रुतलेल्या व स्वनाशा- करितांच कर्माचा बारंभ केलेल्या मूर्खाच्या आपची पाहून दगडही एडतील. मग सचेतन प्राण्यांची गोष्ट कशाला हवी !