पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८१ बृहद्योगवासिष्ठसाद रामा, स्वकल्पित मनाने ज्यांच्या दृष्टीना जाळून सोडलें आहे त्यांची दुःखपरंपरा पाहून माझी मति करुणेनें, व्याकुळ होते. पण पुष्कळ विचार करूनही त्यांच्या दुःखाच्या नाशाचा उपाय सुचत नाही. कारण में दुःख काही निमित्ताने उद्लेले असते त्याच्या निमित्ताचे निवारण केलें असतां तें आपोआप क्षीण होते. पण अज्ञांचे हे मनामुळे उद्भवलेले दुःख निमित्तावाचूनच आहे. म्हणून त्याचा क्षय करितां येत नाही. अथवा गर्दभांप्रमाणे या प्राकृतांचा जन्म दुःख मोगण्याकरितांच झालेला असतो. म्हणून त्याच्याकरितां अथवा त्याच्या सारख्या दुसन्याही असंख्य मूढयोनी- करिता दुःखी होणे मुळीच उचित नसून आपल्या निरतिशय शांती- करिता त्याच्या विषयी उपेक्षा बुद्धि करणेच अधिक श्रेयस्कर आहे. पापी. जन, पाण्यावरील बुडबुच्याप्रमाणे, विनाश पावण्याकरितांच उत्पन्न होत असतात. सर्व सृष्टि दुःखी जीवानीच भरलेली असल्यामुळे त्याच्याविषयी रडत बसून कोणाचाही निभाव लागणार नाही. रामा, प्रत्येक देशातील कसायीखान्यात प्रतिदिवशी किती पशू मरतात याचा थोडासा विचार तर कर पाहूं! त्यातील प्रत्येकाविषयीं दुःख करीत बसल्यास आमची काय दशा होईल बरे? मनुष्यानी मुद्दाम आपल्या जिह्वेच्या तृप्तीकरिता केलेल्या हिंसेचा हा एकच प्रकार मी येथे सागितला आहे. पण अशाप्रकारच्या हिंसा प्रतिक्षणी किती होतात याची काही कल्पना करितां येत नाही. भूमीतून उद्भवणान्या-किडे, मुग्या, माशा, चिलटें, पिसा-इत्यादि असख्य जीवास वायु क्षणोक्षणी मारतो. प्रत्येक दिशेतील अरण्यांत व डोंगराळ प्रदेशात भिल्ल, माग, बेरड इत्यादि क्रूर मानव प्रत्यही लक्षावधि पशूचे प्राण घतात. जलातील मोठे जलचरप्राणी असख्य लहान जलचरांस निर्दयपणे खातात. लिखाना माशा खातात. माशाना डोंगळे, पाली व एका जातीचे कोळी-वाघ खातात. त्यांना चिमण्या, पाली, व दुसरे किडे आपल्या पो- टांत साठवितात, किड्याना बेड़क गिळतात. बेडकांना साप गट्ट करितात. सापाना धारी, गिधाडे इत्यादि पक्षी पटकन उचलून नेतात. मुंगूसही त्याचे तुकडे उडविते. मुंगसास मांजर खाते. मांजरास कुतरा धरतो. कुत्र्यांना आस्व मारतात. आस्वलांस वाघ खातात. वाघांना सिंह पराभूत करितात. सिंहांस शरभ चट्ट करतात, गर्जना करणारा मेघ वरून गेला असतां शरभ मरतात, मेघांना वायू नाहीसे करितात. वायू