पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १४. ६८३ । शिळा विद्यमानच नसते तिला आपल्यापासून दूर कोठे फेंकमार ! । असत् मनालाही जिंकू शकत नाही तो विष न खाताही विषमूर्छने मरेल त काही संशय नाही. 'वस्तुतः जें नाहींच,' असें जें वरच्या वाक्यांत टले आहे तेच आता पूर्वोक्त युक्तीहून निराळ्याच युक्तीनी स्पष्ट करितों, हा. मनाचे प्रयोजन काय ? ते हवे कशाला' विषयाच्या ज्ञानाकरितां 1, स्पदाकरिता की, ज्ञान-कौद्रियाकरिता? विचार करून पाहिल्यास तिील एकाच्याही प्रयोजनाकारता त्याची गरज नाही. कारण प्राणानी पाना प्रेरणा केली आहे अशा इंडियानी जवळ आणलेल्या विषयाचे ज्ञान क्षिी आत्म्याला होणे शक्य आहे. मग मनाची आणखीं अधिक कल्पना रण्यात काय अर्थ आहे ? बरे सर्व शक्ती मनामध्येच आहेत, असे नून प्राण, इद्रिये, चिदात्मा इत्यादि अनेक पदायांची कन्पनाच करूं. ये म्हणून म्हणावे तर एकच वा परस्पर विरोधी क्रिया कशी करील ? पाणाची स्पदन ही शक्ति आहे, परमात्म्याची ज्ञानही शक्ति आहे व द्रियाची विषयाशी संबद्ध होणे ही शक्ति आहे. तेव्हा या भिन्न भिन्न शक्ती एका जड मनामध्ये कशा रहाणार ? तस्मान् सर्वशक्तिमान् आत्म्या- पेच हे सर्व आँपाधिक किरण आहेत, असे मानून मन म्हणून पृथक् वस्तु नाही, असे समजणेच अधिक प्रशस्त होय. __ जीव हा चेतन अधिष्ठाता असून इंद्रियम्पी घोड्याचे नियमन कर- याकरिता त्याला चित्तरूपी लगामाची गरज आहे, म्हणून म्हणशील तर ज्याने या जगाला आधळे करून सोडलें आहे तो जीव म्हणजे काय ? व तू चित्त कशाला म्हणतोस ? ते साग पाहूं. जीव हा आत्म्याहून भिन्न दुसरा चेतन पदार्थ आहे, म्हणून म्हणशील तर एका आत्म्यावाचून दुसरा द्रष्टा, श्रोता, बोद्धा नाही, असे श्रुतीने सागितले आहे व विद्वानाचा अनुभवही तसाच आहे. बरें तो अचेतन आहे म्हणून म्हणावें तर त्यान्यामध्ये स्वतत्र शक्ति कोठची असणार ? कारण अचेतन वस्तु नेहमी चेतनाकरिता असते, असा नियम आहे. त्यामुळे जीव जड आहे, असे मानल्यास इंद्रियादिकापेक्षा त्याच्यामध्ये काहींच विशेष नाही, असं होणार. मग त्याच्यामध्ये अधिष्ठाता होण्याचे सामर्थ्य कोठचें ! यास्तव जीव व त्याचे इदियनियमनाचे साधन चित्त ही दोन्ही असत् आहेत, असें तूं जाण.