पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरण-सर्ग ९. ६७ तेव्हा मूर्त व अमूर्त याच्या सयोगाने जसे एकादे कार्य होते त्या- प्रमाणे शरीरमबद्ध देवाच्या योगाने काही होईल, हे ह्मणणे व्यर्थ आहे. आजपर्यंत जेवढे शूर, पराक्रमी व ज्ञानी पुरुष झाले आहेत ते सर्व पौरुषानेच झाले. त्यातील एकानेही दैवाची अपेक्षा केली नाही. कालवेत्त्या ज्योतिषानी दैवाचे देव्हारे माजविले आहेत. पण ते ज्यास चिरजीव ठरवितात त्याचा शिरश्छेद केल्यास थोड्याच कालात तो कालाचा अतिथि होतो. ते 'हा ज्ञानी होणार' ह्मणून ज्याचे फल वर्तवितात तो विद्याभ्यासा- वाचून साभर होत नाही. यावरून दैवाचा अगीकार करणाऱ्या लोकासही प्रयत्नाची अपेक्षा असते, असेच ठरते. हा विश्वामित्र मुनि प्रयत्नाचें मूर्तिमान् उदाहरण आहे. देवास दूर फेकून देऊन या क्षत्रियाने प्रयत्नानेच ब्राह्मण्य मिळविले. आह्मी व दुसरेही हे सर्व मुनी पौरुषानेच मुनित्वास प्राप्त झाले आहेत. काही योगी व हे सर्व सिद्ध आकाशातून यथेच्छ सचार करितात, हे तुला ठाऊक आहे. पण त्यास ही सिद्धि प्रयत्नावाचून का प्राप्त झाली आहे ? साराश, या असत् दैवाचा लोभ सोड वत् प्रत्येक उत्कर्ष प्राप्त करून देणाऱ्या पौरुषाचा अगीकार कर ८. सर्गर-दैव मिथ्या आहे, हे ठरविण्याकरिता तें मनोमात्र आहे आणि मन व फलासह कर्म ही चिदात्मरूप आहेत, असे येथे वर्णन करितात. श्रीराप-गुरुवर्य, आपण सागता ते मला मान्य आहे. मी आपल्या आज्ञेप्रमाणे पौरुषाचा स्वीकार करीन. पण या दैवाविषयीं दृढ झालेली भावना नाहीशी होत नाही. कारण, या व्यवहारात आपण नेहमी पहातों की, ज्याच्याकरिता आपण कधी प्रयत्न केला नाहीं; किबहुना इच्छाही केली नाही, अशी काही फळे आपणास उगीचच्या उगीच भोगावी लागतात. कधी कधी तर प्रयत्नाच्या व उद्देशाच्या अगदी विरुद्ध परिणाम घडतो. पण कोणताही परिणाम ( कार्य ) निष्कारण होतो, असे ह्मणणे सयुक्तिक नव्हे. तेव्हा अशा अकस्मात् घडणाऱ्या गोष्ठीचे कारण दैवावाचून दुसरे कोणते असणार ? शिवाय आपणही प्राक्तन दैवाचा अगीकार करिताच. तेव्हा दैवाचा अपलाप करण्यांत आपला कोणता हेतु आहे ते मला नीटसे समजले नाही. श्रीवसिष्ठ-राघवा, देव काल्पनिक आहे; वस्तुभूत नाही, ही गोष्ट मी आता तुझ्या अनुभवाम आणून देतो. प्राण्याच्या मनामध्ये जी वासना उठते