पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८२ बृहद्योगवासिष्टसार. त्यात नवल ते कोणते ? पण ती याप्रमाणे मूर्खतेमुळे पीडली जात असतानाही हा जीव असन्मार्गाच्या अनुवर्तनाने तिला अधिकाधिक दुःखी करतो, हे पाहून फार वाईट वाटते. कारण स्वाभाविक अज्ञानाने पीडलेल्या तिला सुज्ञ जीवाने आणखी पीडणे, हे अगदी अनुचित होय. ही मौर्य- मयी सृष्टि फारच नाजूक आहे, असे मला वाटते. कारण नुस्त्या विचारानेच ती नाहीशी होते. पाणी जसें तरगप्रवाहाच्या द्वारा अगदी विरल होऊन कणश क्षीण होते, त्याप्रमाणे ही ज्ञानाने कणशः क्षीण होते. डोळ्यांत घालावयाच्या काजळाप्रमाणे तिचे चूर्ण होते. यास्तव रामा, अशा या अति नाजुक सृष्टीला व असत् मनाला जो वश करूं शकत नाही तो अध्यात्मशास्त्राचा अधिकारी नव्हे. अशा पुरुषाला उपदेश करूं नये. कारण त्याची प्रज्ञा बाह्य विषयामध्येच आमक्त होऊन त्यान्या प्राप्तीनेच आपल्याला कृतकृय समजते. ती मनोनिग्रहास उद्युक्त झालेली नसते. तिचा कल आतल्या आत्मस्वरूपाकडे नमतो. त्यामुळे ती सूक्ष्म विषयाचा विचार करण्याम समर्थ नसते. त्यामुळेच ती वीण्याच्या तारेच्या सूक्ष्म बनीलाही मिते. तिला निजलेल्या बंधूचीही भीति वाटते. असत् प्रतिध्वनि ऐकूनही तिला पळावे लागते. फार काय सागावें, पण हिला तिच्या मनानेही भिवविले आहे. पण रामा, ही दृष्ट प्रज्ञा जरी अशी भितरी असली नरी तिन्या अधीन होऊन पुरुषाने मोहित होणे सर्वथा युक्त नव्हे १३. सर्ग १४-नानायोनीन दुग भोगणा या व उपदेशाम योग्य नमलेल्या लोकाची उपेक्षा मनाच्या मार्जनाचा उपाय श्रीपसिष्ट्र-रामा, संसारसागराया असार कल्लोलानी वाहन नेणान्या ज्या जनसमूहाने मतीचे मूकत्व संपादिले आहे त्याच्या करिता या शास्त्रात मी आता आत्मलाभ करून देणान्या विचार-उक्ती सागतो. जो नेत्रयुक्त अमृनही दूरदृष्टि नमता त्याला ह्या मागणे अगदी अनुचित होय. कारण पीनसरोगाने ज्याचे नाक वास घेण्याम अयोग्य झालेले असते त्याला मुगधाच्या परीक्षणसमयी कोणी परीक्षक करीत नाहीत. मद्य पिऊन मत्त झालेल्या पुरुषाला कोणीही धर्मनिर्णायक समजत नाहीत. स्मशानाताल शवाला कोणी कधी काही सांगत नसतो. हृदयाबळामध्ये बसलेल्या मूक व अध मनः-सोलाही जो मूर्ख जिंकू शकत नाही त्याला उपदेश काय करावयाचा आहे ! वस्तुतः जें नाहींच तें मन जिंकलेच आहे, असे समज.