पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १३. १८१ इन बाधित होणार ! अखंडशक्तिमान् इंद्राशी कोण युद्ध करणार ! कारग चित्न्या विरोधी असलेले सर्व अचित् असणार, हे उघड आहे. त्यामुळे चित् व अचित् परस्पर संबंधी होऊ शकत नाहीत. संबंधी पदार्थाचाच अभाव असल्यामुळे संबंधाचाही अभाव आहे. तेव्हां मनाची वास्तविक सिद्धि कशी होणार ? तात्पर्य चित् व स्पद हे दोन भिन्न पदार्थ आहेत, असें मानल्यास मन मिथ्या आहे, असेच म्हणावे लागते. ___ त्या दोघाची एकता आहे असे मानलें तरी मनाची सिद्धि होत नाही. कारण चित् व स्पंद याचे ऐक्य झाल्यावर तें राहणार कोठे व कसे ? यास्तव रामा, हे दुष्ट चित्त नाहीच, असें तत्त्वतः जाणणे हाच मनोनाश होय. करिता आपल्याच अनाकरिता त्याची व्यर्थ कल्पना करू नकोस. तें व्यर्थ उद्भवलें आहे, परमार्थतः नव्हे. संकल्प न करणे यासारखे मनोना- शाला दुसरे औषध नाही. हे मृगजळ अयथार्थ ज्ञानाने उत्पन्न झाले आहे. जड व निःस्वरूप असल्यामुळे मन सदाच मेलेलें आहे. पण मेलेल्या मना- कडूनच सर्व जीव मारले जातात, हा केवढा चमत्कार आहे ! ज्याला आत्मा नाही, देह नाही, आधार नाही व आकृति नाही त्याच्याकडून हे सर्व खाले जाते. सर्व प्रकारच्या सामग्रीने हीन असलेल्या मनाकडूनही जो मारला जातो त्या मूर्खाचे डोके कमळाच्या पाकळीनेही फुटेल! जड, अध व मूक अशा मनाकडूनही जो मारला जातो तो महा मुखे चंद्रकिरणानीही जळून जाईलसे वाटते ! हे अविद्यमान मन महा शूर लोकांनाही जिंकते. विवेकी जन महा प्रयत्नाने सपादन केलेल्या वैराग्यादि साधनानी व ध्यान-समाधि इत्यादि उपायानी या अविद्यमान मनाला मारतात, असे म्हणणेही व्यर्थ आहे. कारण में विद्यमानच नाही त्याला कोण कसा मारणार ! मिथ्या संकल्पाने झालेलें, मिथ्या अवस्थित असलेले व शोधू लागल्यास न दिसणारे अशा त्या मनामध्ये पराभव करण्याचे सामर्थ्य कसे असणार ! महाहा ! अति चंचल मनाकडूनही प्राणिवर्ग पराभूत केला जावा, ही खरोखर महामायावी मयालाही निर्माण करणारी विचित्र माया आहे. ज्याच्यामध्ये मूर्खता असते तो पुरुष सर्व आपत्तींचे आश्रयस्थान होतो. याविषयी मतभेद होणे शक्यच नाही. ही सृष्टिही मूर्खतेचा ( भज्ञानाचा) विलास आहे. तेव्हां तिच्यामध्ये सर्व भापत्ती जर भरलेल्या असल्या तर