पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८० बृहयोगवासिष्ठसार, आहे. संकल्पोन्मुख झालेल्या भात्म्याच्या शुद्ध स्वरूपांत थोडेसें मालिन्य येणे हाच चित्ताचा जन्म होय. निर्विकल्प अवस्थेपासून ध्युत झालेल्या चित्ची संकल्प-कलंकित सत्ता म्हणजेच कलना होय, स्त्रीच्या संकल्पामुळे पुरु- षाच्या शरीरावर रोमांचादि भाव जसा व्यक्त होतो त्याप्रमाणे संकल्पामुळे जगाच्या उत्पत्तीकरितां आत्म्यापासून मन प्रकट होते. रामा, मन व प्राण यांचा हा असा निकट संबंध असल्यामुळे प्राण- शक्तीचा निरोध केला म्हणजे मन आपोआप लीन होते. कारण पदार्थ नष्ट झाला झणजे आरशातील त्याचे प्रतिबिंबही नष्ट होते, हे प्रसिद्धच आहे. प्रतिबिंब हे आरशाचेच जसें कल्पित रूप तसें मन हे प्राणांचें कल्पित- रूप आहे. ते कशावरून म्हणून विचारशील तर सागतो. जिवंत पुरुष दूर देशाचा मानस अनुभव हृदयांत घेतो. पण देशांतरसंबंध स्पंदा- वाचून व वेदनांश चित्-वाचून होणे अशक्य असल्यामुळे म्हणून मन हे प्राणामध्ये स्पंद व वेदन (ज्ञान ) या दोन्ही शक्ती अति अवश्य आहेत. प्राणाचेच रूप आहे, असे आम्ही म्हणतों. ___ असो; प्राणनिरोधाच्या योगानें मनोनिरोध होतो, हे सिद्ध करावयाचे असल्यामुळे मी एवढा वेळ त्याचे ऐक्य दाखविले. आता त्याच्या निरोधाचा उपाय सागतो. वैराग्य, प्राणायामाचा अभ्यास, समाधि, बाह्य विषयाकार होणे, हे मनाचे व्यसन घालविणे व परमार्थ ज्ञान या उपायान्या योगाने प्राणाचा निरोध करिता येतो. एकादे वेळी पापणामध्येही चलन व ज्व. लन-शक्ति संभवेल पण मनाचे ठायीं स्पंद व ज्ञानशक्ति कालत्रयीं संभव- णार नाही. स्पद ही प्राणवायूची शक्ति आहे, ती चटप व जड आहे. सर्वग व स्वच्छ चिन्छक्ति (वेदन-ज्ञान-शक्ति.) आत्म्याची आहे. चिन्छक्ति व स्पंदशक्ति यांचा संबंध मनाची कल्पना करवितो. मिथ्या ज्ञान हेच मन होय. तीच अविद्या व माया होय. ससारादि विष देणारे ते महा अज्ञान आहे. चिन्छक्ति व स्पंदशक्ति याच्या संबंधाविषयीचे कल्पनारूप निमित्त न झाल्यास सर्व ससारभीति नाहींशीच घाली आहे, असें जाणावें. वायूची स्पदशक्ति चैतन्याकडून जेव्हा चेतित केली जाते तेव्हां ती विषय. युक्त चित्च अंतःसकल्पामुळे चित्ततेस प्राप्त होते. चित्ची ही चित्तता मिव्या कल्पित आहे. जिच्यामध्ये स्पंदरूप नाही अशी चित्च परमार्थ होय. तेव्हा भशी ही अखंड व पूर्ण चित्-म्प भावता दुसन्या कोणा-