पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ बृहद्योगवासिष्ठसार. योगानें कोणत्याही प्राण्याची कलना जाग्रत् झाली म्हणजे ती ब्रह्मतेस प्राप्त होते. पण विज्ञान व शम यांच्या योगाने तिला जागें न केल्यास जगत् तसेच भ्रमण करीत रहाते. विषयासक्ति हेच मद्य. त्याच्या योगाने मत्त होऊन विषयरूपी खड्डयांत लोळत पडलेल्या व भात्म्याच्या अज्ञानाने निजलेल्या कलनेस जागे करावें. कलना जर निजली आहे तर जग जागे कसे असते, म्हणून म्हणशील तर सागतो. जग वस्तुतः जागें नसतेच. जगाचा व्यवहार हा स्वप्नव्यहाराप्रमाणे आहे. विषयाशाचा त्याग केला असता राहिलेली कलनाच आत्मा आहे, असें वर म्हटले आहे. पण त्यावरून वृत्तिज्ञानच आत्मा आहे असें तृ समजू नकोस. तर चित्तवृत्तिरूप कलनेच्याही आत असलेली साक्षिरूप शुद्ध चिति आत्मा आहे, असे जाण. कारण कलना त्या सर्वसाक्षी परमदृष्टीने व्याम दाली तरच आपला विषय व्यक्त करू शकते. न्यावाचून नाही. श्रीराम-गुरुवर्य, चिति जर सर्व साक्षिणी आहे तर ती अतःकरणा- चेच तेवढे धर्म का जाणते जगातील सर्व धर्मास का जाणत नाही ? श्रीवसिष्ठ--नित्यबोध-स्वभाव अशी माक्षि चित सर्व व्यापी जरी आहे तरी प्राण्यानी आपल्या कल्पनेने तिला आपापल्या अत:करणापुरतीच निराळी केली आहे. त्यामुळे ती अतःकरणादिकासच जाणते. वृत्तिरूप कन्टना विवेक केला असता पाषाणासारखी जड आहे, असे कळते व ती जड-असल्यामुळेच साक्षि-चेतनाकडून प्रबोधित होते. नैयायिकादिक या निन्य साक्षीस जाणत नाहीत. त्यामुळे परप्रकाश अनित्य ज्ञानच विषयास प्रकाशित करते, असे ते म्हणतात. पण हे त्याचे म्हणणे अगदी अयोग्य आहे. कारण दगडी पुतळीला कितीही जरी प्रेरणा केली तरी ती जशी माचत नाही त्याप्रमाणे ही जट कलना स्वत. काही जाणत नाही. नित्य चित्चे मानिय नसल्यास अत करणवृत्यादि अचेतनाची विषयाकडे प्रवृत्ति होणेच दुर्लभ आहे. कारण चित्रातील राजानी घोर युद्ध केलेले कोणी पाहिले किंवा ऐकले तरी आहे का ? रक्ताने ज्याची अगें भरली आहेत अशी शवे कधी पळतात का ? मनुष्यानी केलेल्या कृत्रिम सूर्यान्या योगाने रात्री पडणारा काळोख कधी नाहीसा झाला आहे का? आका- शातील कल्पित उपवनांची छाया कोणान्या उपयोगी पडली आहे का ? नाही. त्याचप्रमाणे ही कलनाही स्वतः काही करू शकत नाही. फार