पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६७४ बृहद्योगवासिष्ठसार. मान वाटला नाही. आत्मानुसंधानामुळे तो आत्मरूप झाला. त्याच्या हृदयाकाशांत चिदात्मा उदय पावला. सर्व भाव चिच्छक्तीमध्ये अध्यस्त आहेत व त्यामुळे ते आत्मारूप आहेत, असें तो सतत चिंतन करीत असे. त्याचा आत्मा अनंत झाला. त्या दिवसापासून तो मानद राजा जीवन्मुक्त झाला. राज्य करीत असतांनाही त्याच्या मुक्तिसुखांत कधीही व्यत्यय आला नाही. राज्यातील अर्थ व अनर्थ यांचा परिणाम त्याच्या मनावर कधी होत नसे. त्यामुळेच तो सर्व करीत असूनही काही करीत नव्हता. निद्रित पुरुषाप्रमाणे त्याच्या सर्व भावना अस्तगत झाल्या होत्या. तो पुढे होणाऱ्या गोष्टींचे आज अनुसंधान करीत नसे. होऊन गेलेल्या गोष्टींना कधी आठवीत नसे व वर्तमान कार्य हसत करीत असे. तात्पर्य वा रामा, आपल्या विचारानेच त्याला सर्व प्राप्य प्राप्त झाले. जसा जसा आपल्याशीच विचार करावा तशी तशी विचाराची हद्द जवळ येते. यास्तव शेवटपर्यत विचार सोडू नये. उतावीळपणे त्याला मध्येच सोडणे यासारखी हानि नाही. आत्मा-विचाराच्या दृष्टीने पाहिल्यास गुरु, शास्त्र व पुण्य ही मुद्धां आत्मपदप्राप्तीची गौण साधनें टरतात. सच्छास्त्र, विवेक इत्यादिका- च्या योगाने सुंदर व ऊहापोह-कुशल असल्यामुळे प्रिय सखी अशा शुद्ध प्रज्ञेनेच ते पद प्राप्त होते. ज्याची पूर्वापर विचार करणारी प्रज्ञारूपी दिव्याची शिखा उज्ज्वल झालेली असते त्याला मोहरूपी अंधकार बाधा करीत नाही. विपत्तिरूपी मोठ्या दुस्तर नदीतून प्रज्ञारूपी नावेच्या योगाने अनायासाने जाता येते. ज्याला प्रज्ञा नसते त्याला थोडीशी आपत्तीही महासंकटांत पाडते. प्रज्ञावानाला गुरूचे साहाय्य जरी नसले, शास्त्राचे श्रवणही जरी न घडले तरी केवळ ज्ञानाने बाधित होणान्या व त्यामुळेच अति कोमल अशा संसारातृन तो पार जातो. व्यवहारांत सुद्धा प्रज्ञावानाच्या सहायाने मोठमोठी कामें करिता येतात. इतर कितीही जरी सहाय असले तरी प्रज्ञेच्या अभावी स्वल्पकार्यही सिद्धीस जात नाहीत. यास्तव राघवा, शास्त्र व सत्सग यान्या योगाने प्रथम शुद्ध प्रज्ञा वाढवावी. म्हणजे सर्वोत्तम फळ मिळते. सामान्य जन बाह्यार्थ संपादन करण्याकरिता जसे वारंवार तोच तो प्रयत्न करतात. त्याप्रमाणे प्रथमतः प्रज्ञावृद्धी करितां वारवार तोच तो प्रयत्न करावा. सर्व दुःखांची पराकाष्ठा, आपत्तीचा उत्तम कोश व संसारवृक्षाचे बीज भशा प्रज्ञामांधाचा विनाश