पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. तरी का व्यक्त करू नये ? शिवाय दैव ही भूत वस्तु आहे. कोणतीही होऊन गेलेली गोष्ट पुरुषाच्या अधीन नसते. पौरुषाचा प्रकार याहून अगदी निराळा आहे. ते भविष्य व वर्तमानकालीच होणारे असल्यामुळे पुरु- पाच्या हातात असते. यास्तव जे होऊन गेले आहे, त्याचे फल भोगण्यास तयार राहून जे होणार आहे ते मात्र अनुकूल परिणामीच होईल, प्रतिकूल परिणामी कधीही होणार नाही, असा प्रयत्न करावा. बा प्रिय कुमारा, नू गुरुशुश्रूपा, शास्त्राभ्यास व सदाचार यानी जसा जसा सपन्न होऊ लागशील तसे तसे तुझे ज्ञान अधिक स्पष्ट होऊ लागेल व जसे जमें तुझे ज्ञान वाढेल तसतशी तुझी श्रद्धा, तुझे समाधान व तुझे मुख ही वृद्धिगत होतील ७. सर्ग-दैव मिथ्या आहे, असे जे वर मटले आहे, त्याचेच प्रमाण-विरोधादि युक्तीनी समर्थन करितात. श्रीवसिष्ठ-रामभद्रा, माझ्या या एवढ्या भाषणावरून तू समज- लाच असशील की, देव ही एक कल्पना आहे, दुःखिताच्या समाधानाचा उपाय आहे व ती एक पुरुषाच्या अधीन नसणारी भूत वस्तु आहे. तिला काही आकृति नाही, ती काही कर्मे करू शकत नाही, तिच्यामध्ये स्फरण नाही व पराक्रमही नाही. पौरुप देवाच्या अति उलट आहे. स्याच्या माहात्म्यानेच हे जगच्चक्र चालले आहे. ते जर नसते तर शास्त्रे, गुरु, त्याचे उपदेश, शाळा, दड, निग्रह, नियम इत्यादि सर्व व्यर्थ झाले असते. किंवा याची जगात उत्पत्ति व स्थितिच झाली नसती. कोण- तेही कम प्रयत्नाने सिद्ध होत असते. स्नान, दान, आसन इत्यादि- कातील एकही क्रिया दैव करीत नाही. न्यायाच्या दृष्टीने पाहिले तरी मी वर सागितले आहे तेच सिद्ध होते. दैव अमूर्त ह्मणजे निराकार आहे. त्याचा मूर्त म्हणजे साकार पुरुषाशी संयोग कसा होईल ? दोन मूर्त पदार्थाचाच मयोग होतो असा अनुभव व नियम आहे. १ शारीरक भाष्यात परमपूज्य आचार्यानी आत्मा व मन याचा संयोग; परमा- णूचा परस्पर संयोग; यज्ञानंतर उत्पन्न होणारे अपूर्व; कर्माभावापासून उत्पन्न होणारा भावरूप प्रत्यवाय इत्यादि असत्कल्पनांस कसें तुच्छ करून सोडलें आहे; हे प्रत्येक आचार्यभकास चांगले अवगत माहे. ईश्वराने सामर्थ्य दिल्यास मी मराठी वाचका- सही त्याचा परिचय करून देईन.