पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. राजाच्या मनाप्रमाणे चालण्यांत कुशल असलेला प्रतीहारही गौरव व भय यांच्या योगाने काही बोलला नाही. काही वेळ तशा शांत अवस्थेत बसून तेथील लोकांचे जणुं काय जीवितच असा जनक पुनः शांत चित्ताने विचार करूं लागला. या सृष्टीत प्राय काय आहे? कोणत्या अविनाशी वस्तुमध्ये मी आस्था ठेवू ! मला क्रियापर झाल्याने अथवा निष्क्रिय झाल्याने कोणता लाभ होणार आहे ! कारण दृश्यामध्ये नित्य असे काही दिसत नाही. अथवा लोकरंज- नार्थ माझा हा देह विहित कर्म करो अथवा निषिद्धापासून निवृत्त होवो, त्यामुळे माझ्या सम व शुद्ध चैतन्याची काही हानि नाही. जे अप्राप्त आहे त्याची मी इच्छा करीत नाही व में प्राप्त झाले आहे ते टाकीत नाही. तर आपल्या स्वस्थ स्वरूपांत रहातो. जे माझे असेल ते कांही झाले तरी मजपाशी रहाणारच. कर्म केले तरी मला काही मिळावयाचे नाही व न केले तरी माझे काही नुकसान नाही. कारण मागंतुक असलेले सर्व फल नाशवत असणार हे उघड आहे. शास्त्रविहित अथवा लोकप्राप्त क्रिया करणान्या मला ग्राह्य व त्यामुळेच इष्ट अस काही वाटत नाही. तस्मात् आता हा माझा देह उठन आजपर्यंत त्याला ज्याचा दृढ अभ्यास झाला आहे, अशी कमें खुशाल करो. कारण याने जर काहीच केले नाही; जंग मुळीच हालविलें नाही, तर तो आखडून जाईल ! त्यात काय अर्थ आहे ! मन आत निष्काम, सम व प्रेमरहित असतांनाच बाहेर दारीरावयव जर हालचाल करीत अमले तर करीनात. त्यापासून पुण्यापुण्यरूप फलाचा उदय होणे शक्य नाही, हे ठरलेलेच आहे. कारण मनच आपल्याला कर्माचा कर्ता व त्याच्या फलाचा भोक्ता समजते व त्यामुळेच ते प्रत्यवायी होते. पण त्याने पूर्वोक्त समजूत सोडून शातीचा भाश्रय केला म्हणजे देहाने केलेलें कर्म याचे नव्हे असे उघडच होते. यास्तव मीही माता मनाला शांत ठेवून देहाला अभ्यसा क्रिया खुशाल करू देतो १०. सर्ग १-राजाचे आहिकानुष्टान व पहाटे त्याने मिताला बेलेला बोध. श्रीवसिष्ठ-रामभद्रा, असा पुनः विचार व निश्चय करून जनक दिनकृत्ये करण्याकरितां असक्त मनाने उठला. इष्ट व भनिष्ट वासना टाकून जामत्समयीच सुषुप्तीप्रमाणे त्याने सर्व क्रिया केल्या. निरभिमानाने