पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ उपशमप्रकरण-सर्ग १०. ६.१ तुला नमस्कार असो. मी आता अह व मम हे भाव सोडून आणि अति बलाढ्य मनःशत्रूला मारून शांत होईन ९. सर्ग १०-प्रतीहाराची कर्मानुष्ठानाविषयी राजास प्रार्थना व राजाचा पुनः विचार. श्रीवसिष्ठ-रामचद्रा, जनक याप्रमाणे विचार व निश्चय करीत एकांतात बसला असता त्याचा प्रतीहार त्यान्यापुढे आला व नम्र होऊन म्हणाला " स्वामिन, उठा व राजतेस शोमतील असे दिवस व्यापार करा. प्रभो पुष्पं, कापूर व केशर घालून मुवासिक केलेल्या जलाच्या घागरी भरून घेऊन मुदर स्त्रिया स्नान-भूमीत, साक्षात् नद्याप्रमाणेच, उभ्या आहेत, स्नान करावयाच्या सरोवराच्या तीरावर नाजुक वस्त्राचे मंडप सज केले भाहेत. तेथे इतर आवश्यक वस्तूचेही प्राचुर्य आहे. देवगृहात पूजनाची सर्व तयारी झाली आहे. स्नान, जप, अघमर्षण व तर्पण करून येणान्या तुमचीच दक्षिणेस योग्य असलेले ब्राह्मणश्रेष्ठ, वाट पहात आहेत. महाराज ज्यांच्या हातात चामरे आहेत अशा रम्य स्त्रिया शीतळ भोजन-भूमीमध्ये आपलीच प्रतीक्षा करीत उभ्या राहिल्या आहेत. यास्तव हे देव, सन्वर उठा. आपलें नियत कार्य करा. महात्मे आपल्या कर्तव्याचा रचित काल व्यर्थ घालवीत नाहीत. राघवा, प्रतीहाराने जवळ येऊन असे जरी सागितले तरी राजा पहिल्यासारखा विचार करीतच राहिला-हें राज्य म्हणजे केवढेसें ! व त्यात सुख कोणते? याचा मला काही उपयोग नाही. या सर्व गौड. बगालाला सोडून मी असाच एकातात शांत बसणार. हे मिथ्या भोग बस झाले, सर्व कमें सोडून मी अगदी स्वस्थ बसतो. अरे चित्ता, जन्म, जरा, जाज्य इत्यादि संकटांची निवृत्ति होण्याकरितां तूं भोगकौशल्य सोड. विषयाभिलाष, त्याच्याविषयी प्रयत्न, त्याचा उपभोग, त्याचे अनुस्मरण, इत्यादि दशामध्ये जेथे जेथें तुला सुखल व-भ्राति होईल त्यापासूनच तुला मोटें दुःख होईल. चित्ताला भोगभूमीमध्ये वारंवार फिरवीत दीर्घकाल जरी राहिले तरी त्याची तृप्ति होत नाही. यास्तव ही तुच्छ भोगवासना पुरे झाली. चित्ता, ज्याच्यामध्ये स्वाभाविक तृप्ति होणे शक्य असेल त्याच्याच मागे लाग. असा विचार करून जनक मुकायाने बसला. चंचल मन शांत झाल्या कारणानें तो चित्रासारखा निधल झाला.