पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६७० बृहद्योगवासिष्ठसार. प्रमाण अकस्मात् झाले आहे. पण या भोगलंपट मनाने त्यांतील काही पदार्थ ग्राह्य आहेत व काही त्याज्य आहेत अशी व्यर्थ कल्पना केली आहे. पतंग जसा अग्निशिखेवर आसक्त होतो त्याप्रमाणे मर्यादित व त्रिविधतापग्रस्त अशा या सुखनामक दृष्टीमध्ये मी कसा अनुरक्त झालो आहे ! नरकादिकांतील निरतर दाखभोग संवर्याने अंगवळणी पडतो व त्यामुळे त्याचा फारसा ताप होत नाही. पण या ससारातील थोडें सुख व थोडे दुःख, पुनः सुख, पुनः दाख अशा रीतीने पर्यायाने अनुभवास येणारे दुःख असह्य होते. ससार ही दःखांची पराकाष्टा आहे, असे सायू सांगतात. तेव्हा त्यात पडलेल्या देहात सख कसे असणार ? पण ससारम्पी स्वाभाविक महादुःश्वात पडलेल्या जीवाना न्यातील सामान्य दुःखें म्हणजे मोठी सुवेंच आहेत, असे वाटते. म्हणजे तरवारीच्या मोठ्या आघातापेक्षा लहानशा वादीचा आघात सुखकर आहे, असें झणण्यापैकीच तो प्रकार. हाय हाय श्रुति-स्मृति इत्यादि प्रमाणामध्ये कुशल, वुद्धिमान् व मोठा विवेकी असा मीही अशा दृष्टी मुर्खासारखा होतो, याला काय म्हणावे ? या अवाटव्य मंसार, वृक्षाचा मूळ अंकुर मन आहे व मनाचे मर्म सकल्प आहे. याम्तव आता मी अगोदर संकल्पाचा त्याग करतो. म्हणजे अकुरासह तो महावृक्ष मुकृन जाईल. आजपासून मी या चंचल व नाशवत वस्तूमध्ये रममाण होणार नाही. अनेक भाशापाश, अधोगति, उर्ध्वगति इत्यादिकानी भरलेल्या अनेक ससारगती आजपर्यंत मी भोगल्या आहेत. याम्तव आता मी शात होतो. अरेरे मी मेलों, माझा नाश झाला, माझा सर्वम्वी घात झाला, असें म्हणून मी पुनः रडणार नाही. आता मी चागला जागा झालो आहे. आपल्या परमार्थरूपी धनाला चोरणान्या या मन-नावा या चोराला मी आता पाहिले आहे. आता तो कोठ जातो तें मी पहातो. हा केवल चोरच नव्हे, तर माझा मोठा वैरीही भाहे. कारण याने मला फार दिवसापासून पीडा देण्यास आरभ केला आहे. आजपर्यंत ह मनोम्पी माती अविद्ध होते. पण आता मी त्याला मोक पाडले आहे. तेव्हा यापुढे मला त्यांत शम-दमादि गुण ( दोरी) घालता येतील. हा मनोरूपी लहानसा थेंब विवेकसूर्याच्या तापाने ब्रह्म- तत्वामध्ये स्थिर होण्याकरितां माता मकन जाईल. भाज त्या परोपकारी सिद्धांनी मला उत्तम उपदेश केला आहे. त्यामुळे मी भातां आत्म्याचेच अनुसंधान करीन. मी या भाममणीलाच पहात एकांतात बसेन विवेका,