Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ९. भोग घेईतों, रमणीय असतात. पण ते सर्व अपवित्र व विनाशरूपी नरकाने दूषित झालेले आहे. मानव ज्या ज्या पदार्थांमध्ये आस्था ठेवतो त्या त्यापासून त्याला दुःख होते. जड जन उत्तरोत्तर अधिक पापी. अधिक खेदकर व अधिक क्रूर दशेत पडतो. बाल्यावस्थेत अज्ञानानें, तारुण्यांत मदनवेगानें, व बाकीच्या वयांत कुटुंब-मरणादि चिंतेने त्याला प्रासलेले असते. आदि व अत-समयी असत, भोगसमयीं विरस, दारिद्य, रोग, वार्द्धक्य इत्यादि दशांनी दूषित व ज्यांत असारच सार वाटत असते असा ससार मूढ प्राणी व्यर्थ पहातो. राजसूय, अश्वमेध इत्यादि शेकडो यज्ञ करूनही फार तर कल्पपर्यंत टिकणारा स्वर्ग मिळतो. पण तोही महा कालाच्या दृष्टीने एक लहानसा कालांशच आहे. शरीर असेपर्यंत प्रिय व अप्रिय याचा क्षय होणे शक्य नाही. यास्तव स्वर्ग-लोकी गेल्यावरही आपत्तींचा नाश होईल, अशी आशा करावयास नको. चित्त-बिळांत रहाणान्या माधिव्याधींचे निवारण कसे होईल ? वर्तमानसमयी अनुभवास येणाऱ्या पदार्थाच्या बोडक्यावर नाश बसलेला आहे; रम्य वस्तूंच्या डोक्या- वर अरम्यता बसली आहे व सुखाच्या मस्तकावर दुःखें बसली आहेत. पुनः पुनः उत्पन्न होऊन मरणाऱ्या प्राकृत क्षुद्र जतूंच्या योगानेच सर्व पृथ्वी भरून गेली आहे. त्यामुळे साधूचे दर्शन दुर्लभ झालें आहे. ज्यांच्या नेत्राच्या उघड-झापीमुळे जगाचा उदय व प्रलय होतात असे पुरुप जगांत आहेत. मग माझ्यासारख्या क्षुद्राची गणनाच काय करा- वयाची आहे ! रम्याहून रम्य व स्थिराहून स्थिर असे पदार्थ सृष्टीत आहेत. मग त्यांतील एकाद्याच पदार्थाच्या शोभेची इन्छा का करावी! ती इच्छा चिंता हेंच फल देणार, यात काही संशय नाही. विचित्र संपत्तींना बहुमान देणे म्हणजे महा आपत्तींना थारा देणेच आहे, असें मी समजतो. कारण त्यांची मोठ्या कष्टानेच प्राप्ति करून घ्यावी लागते; त्याचे संरक्षण करतांनाही मोठे दुःख होते व नाश झाल्यास दुःखाला पारच रहात नाही. त्याचप्रमाणे दारिद्य, बंधुनाश, राज्यादिकांचा नाश इत्यादि आपची साधुसंग, तीर्थसेवन, तप, ज्ञान इत्यादिकांस कारण होत असल्यामुळे श्रेयस्करच आहेत, असे मनांत समजल्यास त्या संपत्तीच होतात. या असत्य जगाच्या ठिकाणची ममता वाढविणे हीच विपतिव विवेकाने तिचा क्षय करणे हीच संपचि होय. जग भाकाश-फलपतना-