पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६८ बृहद्योगवासिष्ठसार. झालो आहे व उच्च भागी स्थित असतांनाही पडलों आहे. हाय हाय, अरे आत्म्या, माझी सर्व स्थिति नष्ट झाली आहे. मी मोठा बुद्धिमान् असतानाही मला असा हा मोठा मोह कसा पडला ? हे महा भोग माझे कोण ? हे बांधव माझे कोण ! भूतान्या कल्पनेने बाळक जसा व्याकुळ होतो त्याप्रमाणे मी सकेताने व्याकुळ झालों आहे. जरा व मरण यांची जणुं काय प्रियसखीच व अत्यंत उद्वेग देणारी अशी ही आस्था मी आपण होऊन का उत्पन्न करतों काही कळत नाही. ते महावैभवसंपन्न पृथु-मरुत्तादि राजे, ते सद्गुणवान् सत्पुरुष व ते सर्व स्निग्ध बांधव जर नामशेष झाले आहेत तर वतेमान समयी असणान्या वस्तूंवर तरी आस्था काय ठेवावयाची आहे ? आजवर होऊन गेलेल्या राजाची धनें कोठे भाहेत ? व ब्रह्मदेवाची भुवनें कोटें आहेत ? पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे भाजपर्यंत लक्षावधि इंद्र कालाने गिळून सोडले आहेत. पण हे ठाऊक असतानाही मी जीविताची भास्था धरीत आहे, असे पाहून साधू मला खरोखर हंसतील. कोट्यवधि ब्रह्मदेव गेले. सृष्टीन्या परंपरा नाहीशा झाल्या व अनेक राजे धुळीसारखे उधळून गेले. मग माझ्याच जीविता- विषयी आस्था धरणे मला कसे शोभेल ? संसाररात्रीतील या देह-भ्रमावर आस्था ठेवणान्या मला धिक्कार असो. 'हा मी' ही कल्पना व्यर्थ आहे. या अहंकार पिशाचानेच माझे असे हाल माडले आहेत. क्षण, घटिका इत्यादि सूक्ष्म काललेखा एकसारख्या माझे आयुष्य क्षीण करीत आहेत, हे पाहत असूनही मी असा आंधळ्यासारखा स्वस्थ का बसला आहे ? महाकल्पपर्यंत रहाणान्या ब्रह्म विष्णु-महेशानाही जर कालाने गट्ट करून सोडलें आहे तर माझी काय कथा ? हे दिवस एकसारखे येत आहेत व जात आहेत. आजपर्यंत असे अनेक दिवस मला न कळता निघून गेले. पण अद्यापि असा एकही दिवस उगवत नाही की, जो मला निन्य व एक सद्वस्तु दाखवील. प्राणिमात्राच्या हृदयात भोग स्फुरतात पण भात्मविचार स्फुरत नाही! हाय हाय, अति कष्ट व अति दुःख मी भोगीत आहे. अजून माझ्यामध्ये विरक्ति उत्पन्न होत नाही काय करावे ? आजवर मी ज्या ज्या रमणीय वस्तुवर भास्था टेविली त्या त्या सर्व नाहीशा झाल्या, असाच माझा अनुभव आहे. भायुष्याच्या मध्यावस्थेत पय रमणीय असते; अत्य अवस्थेमध्ये धर्म रमणीय असतो व विषय सकदर्शनी, विचार करीपर्यंत,