पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ९. ६६५ अगदी अल्प भाग मी जिवंत रहाणार. पण त्या थोड्याशा कालातही मी किती आशा करतों व त्या थोडक्याच जीविताची किती तीव्र आकांक्षा करतो, याचा काही नियम आहे का ? हे राज्य म्हणजे केवढेसें आहे ! अगदीच अल्प. तेंही मी जिवत असेपर्यंत फार तर रहाणार! पण असल्या राज्यानेच सतुष्ट होऊन मी मूर्खासारखा भावि दुवाची चिंता मुळीच करीत नाही, हे काय ! देहच आत्मा आहे. यास्तव देहाचा नाश झाला म्हणजे दुःखाचाही नाश होईल. त्याच्या प्रतीकारार्थ व्यर्थ चिंता करण्यात काय अर्थ आहे ? असें किन्येक म्हणतात. पण काम-कर्म-वासना-बीजावाचून भोगवैचित्र्यास कारण होणारा जन्म असिद्ध असल्यामुळे व विधि-निषेध. मोक्षशास्त्र प्रमाण असत्यामुळे मी अनादि-अनत आहे. केवल देहमात्र नव्हे. मग असे जर आहे तर वालक चित्रातील चद्राला जसा खरा चंद्र समजतो त्याप्रमाणे मी अनात्म देहाला आत्मा समजून असा स्वम्ध का बसलो आहे ? अरे अरे! कोणन्या गारुड्याने मला या प्रपचाची भुरळ घातली आहे, काही कळत नाही. सन्य, रम्य, अमर्याद व अजन्य असें या जगात काहीच नाही. मग माझी मति कोणत्या पदार्थाच्या भरवशावर रहाणार ? तसली वस्तु दूर कोठे असेल म्हणून म्हणावे तर दूरही काही नाही. कारण सर्व जग माझ्या मनात आहे. त्याच्या बाहेर काही नाही. मन देहाच्या बाहेर कोठेच जात नाही. ते देहातच सर्व वस्तूचा अनुभव घेते. तस्मात् दूरादि कल्पना भासमान आहे. खरी नव्हे; असा निश्चय करून मी आता बाह्य विषयाची भावना सोडतो. लोकाचा-बनादि भोग- साधनाविषयींचा-सर्व प्रयास जलतरगाप्रमाणे भगुर व जन्म-मरणादि दुःखांचा हेतु आहे, असा मला पुष्कळ वेळा अनुभव आला आहे. मग विषयसुखाविषयी आस्था धरण्यात कोणता लाभ आहे । प्रतिवर्षी, प्रति- मासी, प्रत्यही व प्रतिक्षणी दुःखमिश्रित सुखें व साक्षात् दुःखें पारंवार येतात. या ससारांत भातां असलेली वस्तु घटित नाहीशी होते व पूर्वी नसलेली वस्तु घटकेंत निर्माण होते. भनिश्चित संसारांतील पदार्थी- वर विवेकी सताची आस्था कशी रहाणार ! आज जे महात्म्यांचे भले. सर भसतात तेच काही दिवसांनी धुळीस मिळतात. तेव्हां या दुष्ट चित्ताच्या वैभवावर विश्वास कोण ठेवणार ! हर हर! काय चमत्कार आहे ! 'मी दोरीवाचून बांधला गेलों भआहे. चिखलावाचून मळीन