पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. अहं अशा सर्वव्यापी व सर्व व्यवहारांत उच्चारल्या जाणान्या तत्त्वाची भावना अहंकाररूप उपाधीचे निरसन करून आम्ही सतत करितो. दुसरे-आपल्या हृदयगुहेतील ईश्वरास सोडून, त्याला अगदी विसरून, जे दुसन्या देवाकडे जातात ते हातांतील कौस्तुभ टाकून अन्य रत्नांची इच्छा करीत बसतात. दुसरे-हृदयातील ईशान्या प्राप्तीचे मुख्य साधन वैराग्य असल्यामुळे सर्व आशा सोडल्यावरच हे ज्ञानफल (ब्रह्म) मिळनें व त्याच्या योगाने आशारूपी विषवटीची सर्व मुळे (वासनाच्या योगानें कठिण झालेल्या हृदयपंथी) तुटतात. आणखी कित्येक सिद्ध म्हणतात-भोगानंतर भोग्य पदार्थाविषयी अत्यंत वैरस्य वाटते, या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊनही जो मूर्ख भोग्य वस्तृमध्ये पुनः आसक्त होतो तो मनुष्य नव्हे तर गर्दभ आहे. - दुसरे सिद्ध-इंद्र आपल्या वनाने पर्वताची मस्तकें (शिखरें ) जशी फोडतो न्याप्रमाणे वर डोके काढलेल्या अथवा पडून राहिलेल्या इद्रियरूपी सपांची मस्तकें विवेकदडाने फोडून उडवावी. भाणखी कित्येक-बाय व आतर इंद्रियव्यापार सोडणे हा उपशम होय. या उपशमाचे मुख सपादन करावे. ते विपसुखाप्रमाणे दोपयुक्त नाही, तर चित्तप्रसादाम कारण होणार असल्यामुळे पवित्र आहे. शमा- मुळ चित्त क्षीण होते. ते क्षीण झाले म्हणजे स्वरूपभूत सुखामध्ये उत्तम स्थिति चिरकाट होते ८. सग९-मिगीता ऐकलेल्या राजाचा निवंद व विचार. श्रीवसिष्ठ-ही सिद्धगीता ऐकून, रणवाद्यान्या बनीने भितरा जसा ग्विन्न होतो त्याप्रमाणे, राजा जनक तत्काल ग्विन्न झाला. भापल्या परि- वाराला बरोबर घेऊन तो म्वगृही गेला, आणि त्या सर्वाना आपापल्या स्थानी जावयास सांगून तो एकटाच माडीवर उत्तम भासनावर जाऊन बसला. त्याने चान्या पक्ष्याच्या पखाप्रमाणे लोकगति चंचल आहे असे पाहन, असा विलाप करावयास भारंभ केला.- भरे भरे! फार वाईट. जीवांच्या-जन्म, जरा, भय, मरण-इत्यादिकाच्या योगाने चंबल झालेल्या भति कष्टकर दशांमध्ये हा मी जड व काटण पाषाणाप्रमाणे लोळत पडलो आहे. ज्याला सीमाच नाही अशा कालाचा