पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ८. ज्याचा स्वभाव आहे अशा आत्मतत्त्वशोधनाने निरतिशय भूमानंद रूपाने आविर्भूत झालेल्या आत्म्याची स्थिर व बाह्य विषयविक्षेपशून्य चिचानें आम्ही उपासना करतो. ( या वाक्याचा भावार्य असा-विषयाकार चित्तावृत्तीमध्ये आपोआप व्यक्त होणान्या आनंदाची गणना कोणत्या कोटींत करावयाची ? विषयकोटींत, साधनकोटींत की, कर्तृकोटींत ? विषयकोटींत त्याची गणना केल्यास तो जड आहे, असे होणार व करण आणि कर्ता यातील एकाद्या कोटींत त्याला घालावें तर करण व कर्ता ही दोन्ही कारके ( क्रिया करणारी) असल्यामुळे त्यांच्याहून निराळ्या अनुभव-क्रियेची असिद्धि होणार. पण करण व कर्ता याहून भिन्न अस. लेला आनदानुभव प्रत्यक्ष येतो. तस्मात त्याला साक्षिकोटींतच घातला पाहिजे. अविद्यावरणामुळे ज्याचा चिदानंदस्वभाव मद झाला आहे, असा साक्षीच दुसऱ्या अहंकारात्म्याची कल्पना करून आपण त्याच्याहून पृथक् असल्यासारखा होतो व विषयाकार वृत्तीमध्ये व्यक्त झालेल्या स्वानंदास, त्याचा विषयसा करून, तो आपल्याला निरतिशयानंद समजत नाही. यास्तव स्वतत्त्वाच्या विचाराने व्यक्त झालेल्या त्याच निरतिशयानंद स्वमा- वाची आम्ही समाहित चित्ताने उपासना करितो.) दुसरे काहीं सिद्ध-द्रष्टा, दर्शन व दृश्य, कर्ता, करण व कार्य, ज्ञाता, ज्ञान, व ज्ञेय इत्यादि त्रिपुटया जाग्रत् व स्वप्न या दोन अवस्थातच असतात. व सुषुप्तीत त्या दोन्ही अवस्थातील त्रिपुटींच्या बीजरूप वासना असतात. यास्तव त्रिपुटी व वासना याचा त्याग करून त्यांच्या उत्पत्तींच्या पूर्वीही असणान्या स्वप्रकाश साक्षी भाम्याची माम्ही उपासना करतो. आणखी काही सिद्ध म्हणतात-कार्य व कारण या दोन्हींमध्ये अनुगत असणारे नित्य व सर्व प्रकाश्य पदार्थाना प्रकाशित करणारें में साक्षी भात्मतत्त्व त्याची आम्ही उपासना करितो. अन्य सिद्ध-ज्याच्या आधाराने हे सर्व माहे, ज्याच्या संबंधाने हे सर्व आहे, ज्याच्यापासून हे सर्व झाले आहे, ज्याच्याकरिता हे सर्व आहे, ज्याच्या योगाने हे सर्व आहे व जे हे सर्व आहे ते परमार्थ सत्य प्रत्य- गात्माच आहे, असें जाणून आम्ही तद्रूप होऊन रहातो. दुसरे सिद्ध-भ हे प्रथमाक्षर व हम् हे अंत्याक्षर यांच्या योगाने झालेल्या