पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६४ बृहद्योगवासिष्ठसार. करितो. साराश हे रोघया महा गुणवान् व महा भाग्यवान् असे थोडेसेच पुरुष या क्रमाने हृदयस्थ नित्य प्रकाश पहातात व निर्मल गतीस जातात ६. सर्ग७- कित्येक अति भाग्यसंपन्न पुरुषांस अनायासाने ज्ञान प्राप्ति होते. श्रीवसिष्ठ-रामा, सर्व पुरुषांचा हा सामान्य क्रम सांगितला. भाता हा दुसरा विशेष ऐक. या संसारांत उत्पन्न झालेल्या प्राण्यास मोक्षफळ देणारे हे दोन उत्तम क्रम आहेत. एक गुरूनी सांगितल्याप्रमाणे हळु हळु अनुष्ठान करून एका किवा अनेक जन्मांनी मुक्त होणे व दुसरा आपोआप जीव व जगत् यांच्या तत्त्वाचा विचार सुचून भकस्मात् आका- शातून पडलेल्या फळाप्रमाणे, आत्मज्ञान होणे. यातील पहिल्या क्रमाचे विवेचन पूर्वी बरेच झाले आहे. यास्तव आता या दुसऱ्या क्रमाविषयीं मी एक कथा सागतो, ती ऐक ७. _सर्ग ८-वमतसमयी उपवनात विहार करणाऱ्या जनकाने सिद्धांनी म्हटलेले शुभ लोक ऐकले. __ श्रीवसिष्ठ-विदेह देशाचा जनक म्हणून एक उदारबुद्धि व वीर्यवान् राजा आहे. तो देवी व मानुषी आपत्तिशून्य असून त्याचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत असतो. तो याचकाचा कल्पवृक्ष, मित्ररूपी कमलांचा सूर्य, बंधुरूपी पुष्पाचा वसंत, स्त्रियांचा मदन, ब्राह्मणरूपी चंद्रविकासी कमलाचा चंद्र, शत्रुरूपी अंधकाराचा सूर्य व सौजन्यरन्नाचा सागरच आहे. तो या लोकी विष्णूप्रमाणेच तिच्या पालनार्थ स्थित आहे. तो एकदा वसंत-ऋतु लागून बाललता प्रफुल्लित झाल्या असता व कोकिलाचा पनि सर्वतः ऐकू येऊ लागला असता आपल्या रम्य उद्यानांत विहार करावयास गेला आणि अनु- चरांना दूर रहावयास सागून, क्रीडापर्वतावर आपोआप वाढलेल्या वेलींच्या मंडपाकार झुडप्यांत एकटाच जाऊन बसला. तो इतक्यांत अदृश्य सिद्धांनी आपल्यावर अनुग्रह करण्याकरिताच उच्चारलेली अशी स्मृतिरूप उपनिपद्वचनें त्याच्या कानी पडली. सिद्ध-चक्षु-श्रोत्र इत्यादि इंद्रियांच्या द्वारा विषयग्रहण करणान्या द्रष्टयाचा पुष्पांच्या माळा, चंदनाच्या उव्या, त्रिया इत्यादि विषयरूप दृश्याशी समायोग (संनिकर्ष, संबंध ) झाला असतां विषयाकार बुद्धि वृत्तीमध्ये मानंद भापोभाप व्यक्त होतो. हे प्रसिद्ध माहे. तो भानंद हाच