पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ६. ६६३ मी जाणतों मानवदेहास प्राप्त होऊनही काही अविचारी पुरुष निष्काम कर्मामध्ये आसक्त न होतां सकाम कर्मामध्येच गढून जातात व त्यामुळे वर्गातून नरकास व नरकातून स्वर्गास असे वारंवार हेलपाटे घालीत हातात. पुष्कळसे मानव निषिद्ध कर्मामध्येच आसक्त होतात. कित्येक सत्कर्मापासूनही विरत होतात. त्यामुळे ते एका नरकातून दुसन्या नरकात, एका दुःखातून दुसन्या दुःखात व एका भयातून दुसन्या भयान सचार करीत रहातात. कित्येक स्ववासनारूपी ततूनी बद्ध झालेले जीव दुष्कर्माच्या फलाच्या क्रमानें पशु-पक्ष्यादि तीर्यक्-योनीत उत्पन्न होतात. यातून पुनः स्थावर योनीत जातात व स्थावर योनीतून पुनः तिर्यक्- शरीरी होतात. रामा, बहुतेक सर्व प्राण्याचा हा असाच क्रम आहे. या सृष्टीत अगदी थोडे जीव आत्मज्ञ होतात. तेच वन्य होत. मनाचा साक्षी भसा जो आत्मा त्याचा ते चागला विचार करितात. तृष्णारूपी बच ते तोडून सोडतात व परम कैवल्य पदास जातात, पूर्वी काही योडेसे उत्त- रोत्तर उत्कृष्ट मानव जन्म घेऊन या जन्मात जो मुक्त होतो, त्याला राजस-सात्विक जीव म्हणतात. तो या जन्मात उत्पन्न होऊन शात्यादि गुणसपन्न होतो. त्याला निर्मल विद्या प्राप्त होतान. आर्यता, हृद्यता. मैत्री, सौग्यता, करुणा व ज्ञता त्याचा आश्रय करितात. तो सर्थ कमें तर करितो, पण त्याचे फल मिळाले किंवा न मिळाले तरी सतुष्ट अथवा खिन्न होत नाही. तर तो त्या दोन्ही अवस्थेत सम असतो. दिवसा अंधकार जसा क्षीण होतो त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी द्वद्वे नष्ट होतात. शरहतूतील मेघाप्रमाणे त्याचे गुण शुद्ध होतात. वनातील हरिणे मुर- ळीच्या मधुर स्वराची जशी इच्छा करितात त्याप्रमाणे शुद्ध व सौम्य आचारामुळे मधुर झालेल्या त्याची सर्व जन इन्छा करितात. साराश बलाका जशा मेघाकडे धांवतात त्याप्रमाणे ज्याचा हा चरम (म्हणजे शेवटचा ) जन्म असतो त्याच्यामध्ये बाळपणापासूनच अशा प्रकारचे उत्तम गुण येतात. नंतर गुणसंपन्न झालेला तो योग्य गुरूस शरण जातो. गुरु त्या योग्य शिष्याला पवित्र विवेकामध्ये नियुक्त करतो. काही दिवस विचार केल्यावर तो विवेक व वैराग्य यानी युक्त आणि गुणशाली चित्ताने एकरूप आत्म-देवास पहातो. शांत चित्ताने तो मनन करतो. तो धन्य पुरुष निजलेल्या मनोमृगाला, तें निर्गुण ब्रह्मच होईल, अशा रीतीने जागे