पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६२ बृहद्योगवासिष्ठसार. द्वेतकल्पनेचा असंभव आहे. करितां तूं शुद्ध चित्ताने चिन्मय आत्म्याची भावना सतत कर. सर्व चिन्मय आहे, असे पहा. राघवा, येथे शौक नाही, मोह नाही, जन्म नाही व जन्मवान्ही नाही. तर जे आहे ते आहे. तृ निश्चित हो, म्हणजे झाले. तूं शीतोष्णादि शारीर द्वद्व-विक्षेपररित, सत्त्वामध्ये नित्य स्थित झाल्यामुळेच रजस्तमःप्रयुक्त मानस विक्षेपशून्य आणि त्यामुळे त्या दोन्ही विक्षेपाचा परिहार करण्याचे उपाय अशा योग- क्षेमाविषयींच्या चिंतेने रहित, नेहमी सावधान, अद्वितीय व शोकरहित हो.. सम, स्वस्थ, शात, स्थिरमति, मननशील, मौन धारण करणारा, अविद्या व अविद्येचे कार्य यानी रहित, संकल्परहित, धीर, स्वाधीनचित्त, यदृच्छेनें प्राप्त होईल तेवढेंच करणारा, विरक्त, आयासशून्य, शुद्ध, निष्पाप, ग्रहण व त्याग यानी रहित, पूर्ण, अक्षुब्ध, विकल्पजाळ्यातून सुटलेला, माया- पटलरहित, अमर्याद, मेरूमारवा अढळ, कशाचीही इच्छा न करतां प्राप्त होईल तें भोगणारा, सागरासारखा गभीर व पूर्णचद्रासारखा आपल्यामध्येच स्वतः आह्लाद भोगणारा हो. सर्व प्रपंचरचना असन्य असल्यामुळे तत्त्वज्ञ तिच्या मागे लागत नाही. रामा, तं तत्त्रज्ञ आहेस, यास्तव आता संकल्प- शून्य व त्यामुळेच नि शोक हो. तृ कदाचित् ह्मणशील की, मज तत्त्वज्ञाला राज्यादिकाची काय गरज आहे ? मी आपला सन्यासच करीन. तर ते मात्र बरोबर नाही. कारण तुझा हा देह राज्य करण्याकरितां, साधूचे रक्षण व असाधूचा निग्रह करण्याकरिता प्राप्त झाला आहे. यास्तव हा तुझा पिता जेव्हां देईल तेव्हा एकछत्री राज्याचा स्वीकार कर आणि प्रजेचे पालन कर. कारण अवश्य कर्तव्य कर्माचा व भवश्य भोक्तव्य फळाचा त्याग व त्यांच्या विषयींची भासक्ति ही दोन्ही युक्त नव्हेत १. सर्ग६-कर्माची गनि. चरम नन्मवानाग्या जीवन्मुक्तीकरिता संपादनीय गुणांचा मामान्य क्रम. श्रीवसिष्ठ-लोखडाच्या गतीम कारण होणाऱ्या लोहचुंबकाप्रमाणे, मी हा सर्व सदाचाररूप व्यापार केवल सांनिध्यामुळे करीत आहे, असे समजून जो वासनशून्य मनाने प्राप्त व्यवहार करतो तो मुक्त होय, असे १ व्यक्तत्वा कर्मफलासंगं नित्यतृप्नो निराश्रयः । कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति स. ॥ ह. कर्मफलाविषयींची भासक्ति सोहन नित्यतृप्त व निराश्रय पुरुष कर्मामध्ये प्रवृस झालेला असला तरी काही करीत नाही: अ श्रीगीतावक्न आहे.