पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ५. आत्म्याचे अज्ञान हेच तुमच्या दुःखांचे कारण आहे. पण त्याला जाण- ल्यास तुझांला अनंत सुख व उपशम होईल. या दुष्ट देहाशी तो जणुं काय मिळून गेला आहे. पण विचाराने त्या(आत्म्याला त्याच्या- पासून भिन्न करून सत्वर स्वस्थ व्हा. उशीर लावू नका. मलिन देहाशी या निर्मल आत्म्याचा थोडा सुद्धा संबंध नाही. ब्रह्म व जीव कमलाचे आधारभूत जल व त्याच कमलाच्या पाकळीवरील थेंब, यांप्रमाणे भिन्न माहेत. ( म्हणजे त्यांचा औपाधिक भेद आहे, स्वाभाविक नव्हे.) मी हात वर उचलून व ओरडून सांगत आहे; पण माझें कोणी ऐकत नाही. जडधर्मी मन आत्मविचार विसरून, भोगांचे मार्गच अशा इंद्रियरूपी खड्डयांत जोपर्यंत, चिखलातील कांसवाप्रमाणे बसलेले असते तोपर्यंत चंद, अग्नि व बारा सूर्य यांच्या योगानेही संसार-अंधकार थोडा सुद्धा नष्ट होणे शक्य नाही. मन विषयमोह सोडून सावध झाले व आपल्या स्थितीचा विचार करू लागले म्हणजे सूर्योदयानंतर क्षीण होणान्या रात्रीच्या काळो- खाप्रमाणे हृदयस्थ अंधकार पार नाहीसा होतो. यास्तव योगशय्येवर स्वस्थ पडलेल्या मनाला उत्तम आत्म्याच्या ज्ञानाकरितां व संसाराच्या नाशा- करितां बोध करावा. कारण संसार अति दुःखद आहे. धुळीने गगन व जलाने कमलपत्र जसें लिप्त होत नाही त्याप्रमाणे देहांच्या संब. धानें आत्मा लिप्त होत नाही. सोने चिखलात पडले व त्याला वरून कितीही जरी मळ लागला तरी ते आतून जसें दूषित होत नाही त्याप्र- माणे देहांच्या योगानें भात्मा मलिन होत नाही. आकाशांतील विविध रंगांप्रमाणे आत्म्यामध्ये सुखदुःखानुभवित ( म्हणजे सुखादिकांचा अनुभव घेणे हा धर्म ) खोटेंच भासते. सुख व दुःख वस्तुतः जड देहाचे नव्हे आणि सर्वातीत आत्म्याचेही नव्हे. तर तें अज्ञानाचे आहे. यास्तव अज्ञा. नाचा नाश झाला म्हणजे तें निराधार होऊन आपोआप नाहीसे होईल. अथवा राघवा, सुख व दुःख कोणाचेच नव्हे. तर सर्व भात्ममय शांत व अनंत आहे, असे पहा. जलांतील तरंगांप्रमाणे आत्म्यामध्ये सृष्टिदृष्टी पसरल्या आहेत. रत्नाचा प्रकाश जसा आपोआप पसरतो त्याप्रमाणे मात्म्यापासून सृष्टि आपोआप उद्भवते. हे सर्व ब्रह्म आहे. आत्माच सर्वतः सरला आहे असें जाणून हे निष्पापा, तूं हे निराळे व मी निराळा ही ति सोड. अग्नीमध्ये जसा हिमकणाचा असंभव त्याप्रमाणे ब्रमामध्ये