पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६० बृहद्योगवासिष्ठसार. तामस जीव या दीर्घ संसारमायेला धारण करितात. पण तुझ्यासारखे जे राज- ससात्त्विक अथवा शुद्ध सात्त्विक जीव असतात ते या पिकलेल्या मायेला, सर्पाच्या कातेप्रमाणे, अनायासाने टाकितात. जे शुद्ध सात्त्विक अथवा राजस-सात्त्विक असतात ते जगाच्या मूल परंपरेचा विचार करितात. शास्त्र, सज्जन, यज्ञादि पुण्यकर्म इत्यादिकांच्या योगाने ज्यांचे पाप नष्ट झालें भआहे अशा पुरुषांची दीपिकेसारखी सार पहाणारी बुद्धि उद्भवते. आपणच आपल्यापाशीं विचार करून तत्त्वज्ञान संपादन केले पाहिजे. रघुनंदना, तूं बद्धिमान्, नीतीमान , धीर व कुलशाली अशा राजस-सात्त्विकांमध्ये श्रेष्ठ आहेस. यास्तव बा साधो, या ससार-आरभ-दृष्टींमध्ये सत्य काय आहे व असत्य काय आहे, याचा तू आपणच विचार कर आणि सत्यपरायण हो. जे उत्पत्तीच्या पूर्वी च नाशानतर नाहीं तें सत्य कसलें ! आदि व अंत यांमध्येही में नित्य असते तेच सत्य होय. आदि व अंत या काळी असत् असलेल्या वस्तूच्या ठायीं ज्याचे मन आसक्त होते त्या मूढ पशुतुल्य प्राण्यास विवेक कसा करिता येणार ? यथार्थदृष्टया विचार केल्यास मनच उत्पन्न होतें, तेंच वाढते व वस्तुतः तेंच मुक्त होते. श्रीराम-महाराज, या त्रिभुवनात मनच उत्पन्न होते, तेच संसार करतें व तेच जरा-मरणास पात्र आहे, हे मी जाणले. आता त्यातून तरून जाण्याचा उपाय सागा. रघुकुलातील पुरुषांची गति आपणच आहो.. श्रीवसिष्ठ-राघवा, पूर्वी शास्त्रावलोकन, तीव्र वैराग्य व सजनसंग याच्या योगाने मनाला शुद्ध करावे. त्याच्यामध्ये ज्ञानोदयाची योग्यता आणावी. चित्त अभिमानशून्य व पूर्ण विरक्त झाले असतां मात्मज्ञ व उपदेश करण्यास समर्थ असलेल्या श्रेष्ठ गुरूस शरण जावें. ते सांगतील त्याप्रमाणे सगुण ईश्वराचे ध्यान, पूजा इत्यादि करावे. नंतर त्यांच्याच प्रसादाने विचार करावा. कारण शुद्ध विचाराने आपलेच आपल्याला ज्ञान होते. बुद्धिरूपी नौकेच्या भाश्रयाने विचाररूपी तीरावर येऊन पोचेपर्यंतच जीव भवसागरांत गवताप्रमाणे पहात जातो. विचाराने ज्याला वस्तूचा साक्षात्कार झाला आहे अशा पुरुषाची बुद्धि सर्व मानसिक व्यथांना तुच्छ करून सोडते. विचाराने जीवच अक्षय आत्मा होतो. मग मोहाला अवकाश कोठचा! तत्व कळेपर्यंत मनाची तळमळ चालते. ते कळलें की ती गेली. अहो या सभेतील लोकांनो,