पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ५. मी समजतो. अविद्येचें कालबलाने भंगुर झालेलें, संख्येनें अनंत पण देशकालादिकांच्या योगानें अंतवत् असें स्वरूप तूं लक्षात ठेवलें असशील, असा मी तर्क करितो. चित्त हाच पुरुष आहे, असें में मी सांगितले होतें तें तुला माठवतें ना ? गेल्या रात्री कालच्या उपदेशाचा तू चांगला विचार केलास की नाही ? कारण ऐकलेल्या तत्त्वोपदेशाचा वारवार विचार करून उपदिष्ट अर्थाला मनात स्थिर केले असता त्याचे चागले फळ मिळते व अनादराने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याम श्रवणाचे व्यर्थ श्रम मात्र होतात. तू या असल्या पारमार्थिक शुद्ध वचनाचे खरें पात्र भआहेस, म्हणून विचारतो. श्रीवाल्मीकि-ब्रह्मपुत्र मुनीने याप्रमाणे प्रश्न करून बोलावयास अवकाश दिला असता, राम त्यास असे म्हणाला- श्रीराम-भगवन् , मी आपल्या उदार वचनाचा अर्थ जाणला, हा सुद्धा आपलाच प्रभाव आहे. गुरुवर्य, आपल्या तर्काप्रमाणेच सर्व घडले. काल मी, न निजता, आपल्या उपदेशाचा मनात विचार करीत होतो. आजपर्यंत आपण जे जे काही पवित्र, रम्य व पुण्यकारक वचन सागितले होते ते ते सर्व मी मनात स्थिर केले आहे. हितकारी, हृद्य व आनद देणारे असे ते सर्व आपल्या मस्तकी कोण धारण करणार नाही ! वर्तु सपल्या- वर दिवस जसा स्वच्छ होतो त्याप्रमाणे ससाररूपी धुक्याचे आवरण एकीकडे सारून आम्ही प्रसन्न झालो आहों. आपला उपदेश आरंभी नुस्ता ऐकत असतानाही मधुर वाटणारा, मनन व निदिध्यासन या मध्य- काली शमादिसपत्तीचे सुख वाढविणारा व शेवटी मोक्षाख्य उत्तम फळ देणारा आहे. विकास पावणारे, शुभ्र, टवटवीत व पुण्य-पाप-सुखदुःख इत्यादिकांस आनंद-एक-रसमय करणारे असे तुमचे वचनरूपी-कल्पवृक्षाचे पुष्प सदा सुंदर फळ देणारे होवो. गुरुवर्य, आपण सर्व शास्त्रविचारांत विशारद माहा. आपण तीर्थरूप असून आपल्यामध्ये ज्ञानरूप पुण्य-जल तुडुंब भरले आहे. यास्तव हे भगवन् , आतां भापण काल सांगिल्याप्रमाणे उपशमाचा उपदेश करा १. सर्ग५-अविवेकामुळे वाढलेल्या मनोमात्र जर्गस्थितीच्या उपशमाचा उपाय. श्रीवसिष्ठ-बा सुंदरा, आता हे सुंदर व हितकर उपशमप्रकरण लक्षपूर्वक ऐक. चांगले खांब मंडपाला जसे धारण करितात, तसे राजस व