पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग २. ६५५ जातात का ? मनाचे रूप काय आहे ? तें शांत कसे होईल? ही माया कोणापासून उद्भवली आहे ? ती निवृत्त कशी होणार? ही निवृत्त झाल्याने कोणता गुण अथवा दोष होणार आहे ? आत्मा आकाशाडूनही विस्तीर्ण असताना हा जीव असा संकुचित कसा झाला ? भगवान् वसिष्ठ मुनीने मनाच्या क्षयाविषयी काय सागितलें आहे? त्याचा क्षय कसा होईल व तो झाल्यास कोणता लाभ होणार ? इद्रियजयाचें फळ काय आहे? आत्म्याचे ज्ञान झाले असता कोणते फळ मिळेल. जीव, चित्त, मन, माया इत्यादि विस्तार पावलेल्या रूपानी आत्माच हा असन्मय संसार पसरतो. यास्तव याना मनोमात्र ततूने बाधून क्षीण केले असता दुःखाची शाति होणे शक्य आहे. पण मी याना बाधू कसे 2 भोगसबंची वासना घनरूप होऊन चित्ताकाशास आच्छादित करितात व सहस्रावधि दुःखधाराचा वर्षाव करितात. बुद्धिरूपी बलाकाही न्या मेघांतीच्या मागोमाग जात असते. पण हंस जसा जलापासून दूव निराळे करतो त्याप्रमाणे मी त्या वासना- मेघांशी सलग्न झालेल्या बुद्धीला पृथक् कसें करूं? भोगाचा त्याग करतां येत नाही व त्याच्या त्यागावाचून विपत्ती नाहीशा होत नाहीत. कोण है भयकर संकट! अवश्य प्राप्तव्य आत्मत्तत्वाचे प्रमाण मन आहे. पण त तर बाह्य विषयामध्यें आसक्त होऊन राहिले आहे. त्यामुळे बाह्यविषयांस संपादन करणे हाच मोठा थोरला पुरुषार्थ झाला आहे. त्याला धैर्यान विषयविमुख करिता येत नाही. हिमालयादि पर्वताच्या उल्लघना-इतकच त काम अवघड होऊन बसले आहे. पण ते विषयापासून निवृत्त झाल्यावाचून सत्त्वसाक्षात्कार कसा होणार ! आमची मति अति शात व संसारसंभ्र- मशून्य होऊन, पतिव्रतेप्रमाणे, ब्रह्मावाचून दुसऱ्या कोणाचेही स्मरणमुर्दा करीत नाही, अशी केव्हां होईल. माझें मन काम-क्रोध रहित, पुण्य-पाप- शून्य आत्म्यामध्येच विश्राति, घेणारे व त्या कारणानेंच अति पावन कधी होईल ? पूर्णचंद्राहूनही शीतळ अशा पदी भारूढ होऊन (म्हणजे जीव- न्मुक्तिसुखाचा अनुभव घेऊन) या जगाला मी आपल्या सत्तेनेच भ्रमण करावयास कसे लावीन ? जलातील तरंगाप्रमाणे मन आत्म्यामध्ये लीन केव्हां होईल ? तृष्णारूपी तरगानी आकुल व भाशारूपी मकरांनी भयंकर झालेल्या संसारसागरास तरून मी दुःखरहित कसा होईन ! उप- शमाने शुद्ध झालेल्या मुमुक्षूच्या मार्गामध्ये मी निःशोक व समदर्शन