पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६५४ बृहद्योगवासिष्ठसार. रथपुत्र ज्याची उपासना करीत आहेत असा मुनि वसिष्ठ आपल्या आश्रमांत गेला व तेथपर्यंत बरोबर आलेल्या राजपुत्रादिकास आपापल्या मंदिरी जावयास सागून, चरणांवर मस्तके ठेवून ते सर्व भूचर, खेचर व अधश्वर श्रेष्ठ जीव तेथून परत फिरले असता उदार सत्त्ववान् वसिष्ठाने क्रमाने सर्व माहिक कर्म केले आणि विश्वामित्राशी ब्रह्मचर्चा करण्यांत अवशिष्ट काल सुखाने घालविला १. सर्ग २-रामाची आह्निक क्रिया रात्री, ऐकलेल्या उपदेशाचे चिंतन, व श्रुत अर्यामध्ये स्थिर होण्याविषयीं वुद्धीची प्रार्थना. श्रीवाल्मीकि--नतर ते सर्व चद्रासारखे तेजस्वी राजपुत्र आपापल्या घरी गेले. त्यानी सर्व दिनकृत्ये केली. वसिष्ठ, राघव, राजे, मुनी व ब्राह्मण यांनी आपापल्या गृहात व नदीतीरादि बाह्य प्रदेशी या क्रमाने सर्व उचित कमें केली.-नानाप्रकारची कमलें व हसादि जलचर पक्षी यांच्या योगाने अतिशय रम्य झालेल्या जलाशयांत त्यानी स्नाने केली. गाय, भूमि, तिल, सोने, शय्या, आसन, पात्रे व वस्त्रे याची दाने ब्राह्म- णास दिली. सोने व रत्नें यानी भूपित केलेल्या आपापल्या देवमंदिरांत जाऊन त्यानी अच्युत, ईशान, अग्नि, सूर्य इत्यादि आपापल्या इष्ट देवाचें पूजन केले. नंतर पुत्र, पौत्र, मित्र, सेवकवर्ग, आप्त इत्यादिकासह त्यानी उचित भोजनाचा स्वाद घेतला. भोजनोत्तर ते थोडीशी विश्राति जों घेत आहेत तो इतक्यात अर्धा प्रहर दिवस राहिला, म्हणून पुराण- श्रवणादि उचित कमामध्ये राहिलेला काल घालवून सध्यासमयी त्यानी संध्यावदन केलें. अघमर्पण जप केला. पण्यकारक स्तोत्राचा पाट केला. मनोहर गाथा गायिल्या. तों प्रहर रात्र होऊन पृथ्वीच्या छायेने सर्व भूलोकाला कृष्णवर्ण करून सोडलें. थोडासा उपहार करून सर्व धार्मिक जन उचित शय्येवर जाऊन बसले व ईश्वरस्मरणपूर्वक प्रातःकालापासून त्या वेळेपर्यंत केलेल्या सर्व कृन्याच्या शुभाशुभतेचे परीक्षण करून शय्येवर पडले. रामावाचून बाकी सर्वाना झोप लागली व त्याची ती रात्र दोन घटिकासारखी हो हां म्हणता गेली. पण दशरथाचा ज्येष्ठ पुत्र राम दिवसां ऐकलेल्या वसिष्ठांच्या उपदेशा- विषयींच विचार करीत बसला. हे संसारभ्रमण म्हणजे काय आहे ! हे सर्व जन सणजे आहे तरी काय! ही सर्व विचित्र भते येतात कां व