पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १. ६५६ चंचल मनाला सर्व भोगांपासून परतवून श्रवणामिमुख के. शिक्षणाच्या बलामुळे विचक्षण झालेल्या लक्ष्मणाच्या चंद्रासारख्या निर्मल चित्तांत, ब्रह्म करण पावू लागले. शत्रुनाशक शत्रुघ्न आनंदपूर्ण मनाने शोभू लागला. सुमित्र नावाच्या मंत्र्याच्या हृदयात ज्ञानसूर्याचा प्रकाश पडला. तात्पर्य वसिष्ठानी उपशम-प्रकरण सांगण्याची प्रतिज्ञा केली असतां त्या सभेत सर्वतः उपशम पसरला आणि सर्व उपदेश ऐकण्याविषयी अतिशय उत्सुक झाले. पण इतक्यांत 'शुभकृत्याला विन्ने नेहमी प्रतिबंध करितात' ही म्हण जणुं काय सार्थ करण्याकरितांच मध्याहकाल झाला हे सुचविणारा सागरासारखा गंभीर शखध्वनी झाला. त्याबरोबर मेघाच्या नादानें कोकिलांचे ध्वनी जसे बंद पडतात त्याप्रमाणे या मोठ्या शंखध्वनीपुढे मुनीचा शब्द कोणालाही ऐकू जाईनासा झाला. म्हणून भगवान् वसिष्ठाने आपली वाणी बंद केली. कारण सुज्ञ पुरुष आपला गुण व्यर्थ प्रकट करीत नसतात. तो महा मुनि क्षणभ, स्वस्थ राहिला व शखाचा ध्वनि आणि त्यामुळे झालेला लोकांचा कोलाहल शांत झाला असतां, रामास म्हणाला, "प्रिय शिष्या, आज हे इतकेंच सांगून झाले आहे. आता या पुढे जे काही वक्तव्य माहे ते उद्या सकाळी सांगेन, द्विजास अवश्य कर्तव्य असलेलें मध्याहकृत्य मलाही केले पाहिजे. यास्तव हे आचारचतुरा, हे सुभगा, तूं सुद्धा ऊठ. स्नान, दान, पूजन इत्यादि भाचार-सस्कमें कर. " असे बोलून मुनि व प्रभु दशरथ एकाच वेळी उठले. त्याबरोबर सर्व सभेत हालचाल सुरू झाली. शेकडों राजांनी भरलेली ती सभा उठली. दशरथाला प्रणाम करून राजे राजमंदिरांतन निघून गेले. सुमंत्र-प्रभृति रसज्ञ मंत्री राजा व मुनि यांस प्रणाम करून स्नानांकरितां आपापल्या घराकडे निघाले. वामदेवादिक व विश्वामित्रा- दिक वसिष्ठास पुढे करून राजाच्या अनुज्ञेची प्रतीक्षा करीत राहिले. राजा दशरथाने मुनींचे पूजन केलें, व त्यांची भाज्ञा घेऊन आणि त्यांस अनुज्ञा देऊन स्वकार्याकरितां स्वमदिरीं गमन केलें. नंतर वानप्रस्थ वनांत गेले. आकाशनिवासी भाकाशांत गेले व नाग- रिक नगरांत गेले. राजा व वसिष्ठ यांनी प्रेमाने आमंत्रण दिल्यामुळे प्रभ विश्वामित्र वसिष्ठाच्या घरीच जाऊन राहिला. त्याने तो भवशिष्ट दिवस माणि रात्र तेथेच घालविली. ब्राह्मण, राजे, मुनी व रामादिक सर्व दशः