पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ बृहद्योगवासिष्ठसार. त्याची मुख्य माधने आहेत. वेद, स्मृति इत्यादि सन्छास्त्राचे अध्ययन केल्याने या वरील तीन साधनाचे अनुष्टान व रक्षण कसे करावे, ते समजते. अर्थात् सच्छास्त्राचे अध्ययन हे पुरुषार्थाचे पहिले कारण आहे. याच्या योगाने सदाचारादिकाचा लाभ होतो. सदाचारादिकाच्या योगाने शरीर सु- दृढ झाल्यावर चित्ताचे समाधान होईल, असा प्रयत्न करावा. त्यास सर्व बाह्य विषयापासून परतवून आणून आत्म्यामध्ये स्थिर के- ल्याने त्याचे परम समाधान होते, आणि असे केल्यानेच उत्तर जन्म घ्यावा लागत नाही. पण पौरुषावाचून चित्ताचे समाधान होत नाही. देवाला हटविण्याकरिताच पौरुषाची गरज लागते. कारण विरुद्ध देवाने प्रतिबध न केल्यास आत्मसाक्षात्कार होणे फारसे अवघड नाही, हे मी आताच तिले आहे. दैव फारच प्रबल असल्यास त्याचा या जन्मी नाश नाहीं होणार, तरी वीर सोडू नये. या जन्मी केलेला प्रयत्न व्यर्थ जाणार नाही. तो उत्तर जन्मी आपला प्रभाव दाखवील. दैवपरायण होऊन जे उद्योग मोडिगन ते आत्मशत्रु धर्म, अर्थ व काम याचा घात करितात. देव प्रत्यक्ष नाही पण पौरुष प्रत्यक्ष आहे. कारण हा अमुक पुरुपार्थ आहे व हे याचे मावन आहे, अशी चित्तात स्फूर्ति होणे यास सविस्पद म्हण- तात, याच्या योगाने आपण ते साधन करावे, अशी इन्छा होते. त्यास मनःस्पद म्हणतात. त्याच्या योगाने अनुकूल व्यापाराकरिता ( देहाची हालचाल करण्याकरिता ) कर्मेद्रिय प्रवृत्त होतात. यास इद्रियस्पद म्हणतात. त्याच्या योगाने शरीराची प्रवृत्ति मरू होते ही सर्व पौरुपाची क्रमाने अनु- भवास येणारी स्वरूपे आहेत, व बुद्धि, मन इत्यादिकान्या सतत प्रवृत्तीमुळे इष्टसिद्धि होते, हे सुप्रसिद्ध आहे. पण दैव अशारीतीने कधीच कोणाच्या अनुभवास येत नाही तर आकस्मिक परिणामाकडे पाहून नतर हे देवाचे फल आहे, असे आपण नेहमी अनुमानाने ठरवितो. यास्तव असल्या आनु- मानिक देवास सोडून प्रत्यक्ष प्रयत्नाचाच आश्रय करावा, हे चागले. कायिक, वाचिक व मानसिक असे त्रिविध पौरुप आहे. निरनिराळ्या प्रसगी त्यातील एकेकाचे प्राधान्य असते. ध्यानादि प्रसगी मानस पौरुषाचे, स्तवनादि प्रसंगी वाचिक पौरुपाचे व यात्रादि प्रसगी शारीरिक पौरुषाचे प्राधान्य असते. या विविध शास्त्रीय पौरुषाच्या योगानें नर नारायण होतो. पण जे 'अवि- चारी मोठ्या योग्यतेस चढलेले असूनही निषिद्ध प्रयत्न करितात ते