पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥श्रीः॥ अथ पचंमं उपशमप्रकरणम् सर्ग १-मध्याहकाळी शंखध्वनि होताच सभा उठते. श्रीवसिष्ठ-रामभद्रा, स्थितिप्रकरणानंतर आता हे उपशम-प्रकरण ऐक. याचे पूर्ण ज्ञान झाले असता निर्वाण प्राप्त होते. __ श्रीवाल्मीकि-मुनिवर्याचे हे पवित्र व आहाद देणारे वचन ऐकून सर्व सभा स्तब्ध झाली. श्रवणाच्या इच्छेने सर्व सभासदांनी मौन धारण केलें. फार काय पण विलासिनी स्त्रियासुद्धा फार दिवसांपासून संन्यास केलेल्या प्रवजित-स्त्रियांप्रमाणे शांतचित्त होऊन बसल्या. त्यामुळे त्याच्या भूषणादिकाचाही ध्वनि त्यावेळी होत नव्हता. त्या सभेजवळच्या वृक्षांव- राल पक्ष्यांनीही आपला किलकिलाट बद केला. विवेकी राजे विज्ञानकलेचा विचार करू लागले. प्रभातसमयीं कमल जसें विकसित होते त्याप्रमाणे रामाचे मुख व हृदयही गुरूंच्या त्या वचनाने विकसित झाले. राजा दशरथही श्रीवसिष्ठांची वाणी मोठ्या प्रेमाने ऐकत होता. मुख्य मंत्र्याने मर्कटासारख्या तिसऱ्या उत्पत्ति-प्रकरणांत उपनिषदातील सर्व सृष्टि-प्रातिपादक पचनाचे तात्पर्य प्रकट करण्याकरिता सर्व प्रपंच-रचना मनाच्या अधीन आहे, असे सांगितले. चवथ्या स्थिति-प्रकरणांत जगाच्या स्थितीचे प्रतिपादन करणाऱ्या श्रुतीचे तात्पर्य स्पष्ट कर ण्याकरिता मन स्थितीय्या अधीनच सर्व प्रपचस्थिति आहे, असे दाखविले व आस -अस्त पावणाऱ्या सूर्याचे किरण जसे त्याच्या मंडलात जाऊन मिळतात, स्याप्रमाणे या मात्म्याच्या सोळा फला त्याच्यामध्ये मिळतात, सुषुप्तीसमयी सर्वांचा रूम मासा असता पुरुष तमोभिभूत होत्याता मुखरुपास प्राप्त होतो; प्रलयसमयीं सर्व भूतें ज्याच्यामध्ये जाऊन लीन होतात, जशा वाहत जाणाऱ्या नया समुद्रात जाऊन प नाम-रूप सोहन अस्त पावतात, पंधराही कला प्रतिष्ठेस प्राप्त होतात, इत्यादि प्रपंचोपशमाचे प्रतिपादन करणाऱ्या उपनिषद्वाक्यांचे तात्पर्य व्यक करण्याकरिता या उपशम-प्रकरणाचा आरंभ करीत आहेत. सुषुप्ति, मरण, समाधि, साक्षात्कार व विदेहमुक्ति या दशांमध्ये प्रपंचाचा उपशम होत असतो. पण तो मनाच्या उपशमामुळेच होत असल्यामुळे सर्व उपक्षम-प्रतिपादक वाक्यांचे तात्पर्य मनःशांती- मध्ये आहे, असे या प्रकरणांत मुख्यतः सांगावयाचें माहे.