पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ स्थितिप्रकरण-सर्ग १२. सागराचे उल्लंघन सहज करू शकतात. तुझ्यासारखी ज्याची मति असेल तोच समदृष्टि सुजन मी सांगितलेल्या या ज्ञानदृष्टीस योग्य होय. रामा, तूं रागद्वेषशून्य बुद्धीनें रहा. बाहेरून लोकोचित आचार कर व आंतून निरिच्छ रहा. इतर गुणशाली पुरुषाप्रमाणे परम शाति धर. दुसऱ्यास फसविणाऱ्या व यथेष्ट आचरण करणान्या मूढाविषयीं तू मुळीच विचार करूं नकोस. शुद्ध सात्विक जीवन्मुक्ताच्या शम-दमादि स्वाभाविक गुणांचे संपादन करणारा साधारण पुरुषही क्रमानें ज्ञानी होतो. आणि शेवटच्या जीवन्मक्तावस्थेचा अनुभव घेतो. कारण उत्कृष्ट जातीच्या गुणांचे सेवन केले असता प्राणी उत्कृष्ट जातीत जन्म घेतो व निकृष्ट जातीच्या गुणाचे सेवन केल्याने तो निकृष्ट योनीत पडतो, असा नियम आहे. कर्मवश झालेले जीव मरणसमयीं चिंतिलेल्या भावास अवश्य प्राप्त होतात, अमें जरी आहे तरी निकृष्ट जातीत झालेल्या पुरुषानेही मोक्षा- करिता अवश्य यत्न करावा. कारण सर्व काही प्रयत्नसाध्य आहे. प्रय- त्नानेच राजे राज्ये मिळवितात. तामसी, राजसी इत्यादि कोणत्याही जातींतील पुरुषाने चिखलात रुतलेल्या गायीप्रमाणे, विषयात आसक्त झालेल्या बुद्धीला धैर्याने वर काढावे. तिला विषयपराङ्मुख करावे. संत भात्मविवेकामुळेच सात्त्विक जातीस प्राप्त होतात. स्वच्छ चित्तस्फटिकामध्ये ज्याला आसक्त करावें तन्मय तें (चित्त) होते. यास्तव तू उद्यम कर. सर्वो- त्तम गुणशाली पुरुष भगीरथ प्रयत्नाने मुमुक्षू होऊन शेवटी याच जन्मात जीवन्मुक्त होतात. गुणवानास दीर्घ प्रयत्नाने प्राप्त होत नाही असे या जगांत काही नाही. ब्रह्मचर्य, धैर्य, वीर्य, वैराग्य व युक्तियुक्त निश्चय यांवाचून ते इष्ट पद तुला मिळणार नाही. एकाग्र बुद्धीने अत्यंत हितकर मात्मतत्त्वास जाणून तू शोकरहित हो. तुला सागितलेला क्रम सर्व- साधारण आहे. ह्मणजे या क्रमाने दुसराही अधिकारी जन मक्त होईल. हे रामभद्रा, विवेकाच्या महा महिम्याने युक्त व पुष्ट झालेल्या शांत्यादि सर्व गुणांनी अभिराम असा शेवटचा जन्म प्राप्त झाला असता तं जीव- मुक्तांच्या सप्तमभूमीकालक्षण कर्मामध्ये स्थित हो. वैराग्यप्रकरणांत वर्णिलेली व सर्व जनप्रसिद्ध अशी ही भवसंगमोह-चिंता तुझ्या ठायीं स्थान न करो ६२. इति श्रीमच्छंकराचार्यभक्त विष्णुकृत बृहद्योगवासिष्ठसाराचे चवयें स्थितिप्रकरण समाप्त झाले.