पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. एमाणे. हे सर्व ओवले आहे. जी चित् भुवनविस्तारांत, भाकाशांत, सूर्यात. व भूमीतील विवरांत असते तीच एकाद्या अल्प किड्याच्याही पोटांत असते. एकाद्या विस्तृत प्रदशी सहस्रावधि नाना आकाराच्या घागरी जरी ठेविलेल्या असल्या तरी त्यांतील आकाशांत जसा परमार्थतः भेद नाही त्याप्रमाणे अनेक विचित्र शरीरात असलेल्या चैतन्यातही भेद नाही. सर्व भूताना बांबट, तिखट इत्यादि पदार्थाचा जर एकसारखाच अनुभव येत आहे तर चिन्मात्र तत्त्वामध्ये भेद आहे, असे कसें ह्मणता येईल ? एक सन्मात्र वस्तुच जर सतत स्थित आहे तर ' हा झाला, हा मेला ' इत्यादि दृष्टिही कुदृष्टि होय; शास्त्रदृष्टि नव्हे. जगात असे काही नाही की, जें असून नष्ट होईल. यास्तव आहे असे वाटणारे हे सर्व सत् नव्हे व असतही नव्हे. कारण तें व्यवहारकाली दिसते म्हणून असत् नव्हे. व समाधि, मुषुप्ति इत्यादि काळी बाधित होते म्हणून सत् नव्हे. ज्ञान जरी सफल असले तरी या ज्ञानाने बाधित होणान्या मोहालाही याच न्यायाने सदसद्विलक्षण म्हणावे लागते. तस्मात् अनिर्वचनीय अध्यासामुळ कसे तरी उद्भवलेले हे जग मोहाचे कारण आहे, हे सिद्ध झाले ६१. सर्ग ६२-शास्त्रोक्त गुणसपत्ति, सत्संग व पौरुष याच्या योगाने अश्रेयालाही श्रेष्ठ स्थिति प्राप्त होते. श्रीवसिष्ठ-रामा, बाह्य व आभ्यतर द्वद्वांस सहन करणान्या व ऊहा- पोह-कुशल पुरुषाने विद्वान् व सुजन गुरूस शरण जाऊन शास्त्रविचार करावा. कुलीन, महा विद्वान् व निःस्पृह अशा गुरूबरोबर शास्त्रविचार केला असता मनोनाशापर्यत समाधि प्राप्त होते. अध्यात्मशास्त्र, सत्सग, वैराग्य इत्यादिकाच्या सतत अभ्यासाने सस्कृत झालेला पुरुष आत्मज्ञानाचे पात्र होऊन तुझ्याप्रमाणे शोभतो. तुझ्यामध्ये सर्व उक्त गुण आहेत. कारण तूं उदार, आपल्या भाचाराने संपन्न, द्वद्वमहिष्णु व विचारवान् आहेस. सगेसबधी मनोमल सोडून तू दाखशून्य झाला आहेम. खरोखर तूं स्वच्छ आकाशासारखा आहेस. तू ससार भावनेचा त्याग केला आहेस. तू उत्तम ज्ञानसंपन्न झाला आहेस. सर्व चिंता सोडून ब्रह्माकार झालेले मन मुक्त झेप. तुझे मनही मुक्त झाले आहे. यास्तव पूर्वोक्त जीवन्मुक्त रागद्वेपरहित होऊन माता तुझेच अनुकरण करतील. जे तुजसारखे महा बुद्धिमान् जन भात आत्मज्ञ राइन बाहेर लोकाप्रमाणे व्यवहार करितात ते संसार-