पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ६१. भाकाशास जसा मळ लागत नाही त्याप्रमाणे त्यांस खेद स्पर्श करीत नाही. रात्री सुवर्ण-कमळ जसें म्लान होत नाही, त्याप्रमाणे ते मापत्तीच्या योगाने शारीर दुःख भोगीत नाहीत. ज्याप्रमाणे वक्षादिक प्रारब्ध भोगावातून दुसरे काही करीत नाहीत त्याप्रमाणे ते प्रकृत ज्ञान व त्याची साधनसंपति यावाचून दुसरे काही करीत नाहीत. वृक्ष जसे आपल्या पुष्प-फलादिकांनी, त्याप्रमाणे ते आपल्या सदाचारांनी रममाण होतात. रामा, राजस-सत्त्वसपम पुरुषाची बुद्धि शांत्यादि अमृताची वृद्धि झाली असता स्वतः परिपूर्ण होते व त्यामुळेच ती शुक्लपक्षातील पूर्णचद्राप्रमाणे सुदर दिसते.. अशा प्रकारची बुद्धिच मोक्षास प्राप्त होते. राजस-सात्त्विक पुरुष आपत्कालीही आपली सौम्यता सोडीत नाहीत. ते स्वाभाविक मैत्र्यादिगुणरूप कांतेच्या योगानें विराजमान होत असतात. ते सर्वत्र समभाव ठेवणारे पुरुष सतत साधूंहूनही अति साधू आहेत. ते नेहमी मर्यादेचे पालन करितात. त्याना निरुपद्रव पदास जावयाचे असते. यास्तव त्यानी या जगात अखिन्न मनाने व्यवहार करावा. रजोगुणाचा क्षय करून सात्त्विक होणारे पुरुष स्वानंद लाभ झाला असता, जसे जसे वृद्धि पावत जातात तसे तसे त्याना विषयचिंतन सोडून सच्छा. स्त्रचिंतन करणे उचित होते. पदार्थाच्या अनित्यतेचा विचार मोठ्या आद- राने करावा. त्याचप्रमाणे शुद्धबुद्धि पुरुषाने ऐहिक व पारलौकिक क्रिया आणि पशु-पुत्रादि ऐहिक व विमाने, अप्सरा इत्यादि पारलौकिक पदार्थ म्हणजे महा आपत्तिच आहे असे जाणावें. व्यर्थ व अज्ञानसंततियुक्त अयथार्थ दर्शन सोडून सार्थ, अनंत व यथार्थ ज्ञान संपादन करावे. सत्पुरुषास शरण जाऊन व शुश्रुषाप्रभृति उपायानी त्यांस प्रसन करून 'प्रभो' मी कोण? हे संसार-आडंबर कसे झाले ? इत्यादि प्रश्न करावा. ते में सांगतील त्याविषयी विचार करावा व त्याविषयी निश्चय करल तत्त्वाचे अनुसंधान करावें. लौकिक व वैदिक कर्मामध्ये बुडून जाऊ नये. अनर्थाचा सहवास करू नये. संसारांत क्षणोक्षणी अनुभवास येणाऱ्या प्रियवियोगाचा विचार करावा. साधूचीच सगति धरून त्याच्या मार्गाचेच अनुकरण करावें. अहंकार, देह व पुत्रादि हे तीन महा सागर आहेत. त्यातून पार होण्याकरिता विचार करावा. सत्याचा शोध करावा. अस्थिर शरीर व अहंकार यांचा त्याग करून अत्यंत शुभ व साक्षिचिन्मात्राचे अनुसं- धान करावे. त्याच नित्य, सर्वगत, शिव पदामध्ये, माळेच्या दोरीतील मच्या