पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४८ बृहद्योगवासिष्ठसार. रघुनायका, आता मुख्य प्रथम संघांत प्राजापत्य अधिकाराने मालेल्या केवळ सात्त्विकास मोक्ष कसा मिळतो ते सांगतो. विधिसंघात उत्पन्न झालेला कोणताही जीव पुनः कधीही जन्म घेत नाही. तर तो मुक्त होतो. राजससात्त्विक पुरुषच पुनः पुनः जन्म घेतात. केवळ सात्विक पुनः जन्म का घेत नाहीत तेंही सांगतो. पूर्व जन्मामध्येच श्रवणादि उपायांच्या योगाने आत्मतत्त्वाचा विचार करून, केवल प्रतिबंध क्षीण करण्याकरितांच, ते हा साविक जन्म घेतात. या उत्तम व योग्य जन्मांतही त्यांना सदा आत्मतत्त्वाचेच मनन व अनुसंधान करा- वयाचे असते. पण रामा, असले महा गुणशाली पुरुष फार दुर्लभ होत. या तीन सघाइन निराळे असलेले राक्षस, पिशाचे, तिर्यक इत्यादि प्राणी, स्थावरासारखेच असल्यामुळे, ज्ञानाधिकार-कथेमध्ये विचार कर. ण्याच्या योग्यतेचे नसतात. म्हणून मी त्या तामस जातीच्या लोकांचा निर्देश येथे करीत नाही. असो; राघवा, एवढ्या या वर्णनावरून देव व नरच तत्त्वज्ञानाचे खरे अधिकारी आहेत, हे तुला कळले असेल. पण बाबारे, नुस्त्या उत्तम जन्मानेच काम भागत नाही; तर विषयाविषयी अचल वैराग्यही लागते. त्यावाचून तत्त्वज्ञान अति दुर्लभ आहे. देव व नर यातील काही अगदी थोडेसेच जीव सासारिक भोग-रुचीस प्राप्त होत नाहीत. त्यातील माझ्या- सारखा एकादा जन्मापासूनच शम-दमादि-सपन्न असल्यामुळे आत्मविचार करण्यास योग्य असला तरी त्यास पुरोहितपणा-सारखे कष्टकर प्रारब्ध अधिकार चालवावयाचे असल्यामुळे, निरतर समाधिसुख मिळत नाही. यास्तव तो राजस-सास्तिक होय. शुद्ध सात्त्विक नव्हे. दशरथपुत्रा, माझ्याप्रमाणे तूही वैराग्य, शम, दम इत्यादि संपनीने परिपूर्ण आहेस. पण परमात्म-पदाचा विचार केलेला नाहीस. म्हणून तुला ही ससारभ्रांति सोडीत नाही. यास्तव तूं आतां येथे माझ्या समोर त्या पदाचा सत्वर विचार कर. म्हणजे तुच अद्वय पद होशील ५.. सर्ग १-मुक्तियोग्य राजस-सात्विक लोकांची प्रशंसा व त्याच्या विवेकौराग्या- दिकांचा कम. श्रीवसिष्ठ-पामचंद्रा, जे महागुणवान् विचार करण्यास योग्य अस. छेले पुरुष भूलोकी राजस-सालिकी जातीने उत्पम होतात ते धन्य होत.