पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ६०. २४७ प्रधान होतात. नंतर अन्नादिकांच्या द्वारा जरायुज शरीरांत प्रवेश करून त्यांच्या वीर्यभावास (रेतोरूपास ) प्राप्त होतात. नंतर ज्याचे ज्ञान व ऐश्वर्य व्यक्त नाही असे प्राणी होऊन ते या जगांत उत्पन्न होतात. रामा, मागच्या सर्गात सागितलेल्या तिस-या संघाचा हा उत्पत्तिकम आहे. आता दुसन्या संघाचा क्रम सागतो, ऐक. त्याचाही लिंगदेह-प्राप्तीपर्यंत पूर्वोक्त क्रमच आहे. नतर ओषधि-वनस्पतीमध्ये प्रवेश करून, पशूच्या शरीरांत जाऊन दूध, तूप इत्यादि परिणामास प्राप्त झाल्यावर होमाचे वेळी आहुतिरूपानें अग्नीत जाऊन धूमद्वारा सूर्यमडलास प्राप्त होतात. किंवा सूर्यकिरणाच्या द्वारा चद्रात प्रवेश करतात. चद्रकिरणांच्या द्वारा कल्पवृ- क्षाच्या फळात रसरूपाने त्याचा प्रवेश होतो व ती फळे खाणाऱ्या कश्यपादिकाच्या शरीरात जाऊन वीर्यरूप झालेले जीव अमूछित बाप व आई याच्या गर्भाशयात मूछित झाल्यासारखे रहातात. म्हणजे ज्याच्या शाखा, पाने, फळे इत्यादि सर्व व्यक्त आहे अशा वडाच्या झाडावर न्याच्या शाखा, पाने इत्यादि अव्यक्त नाही अशी वटबीनें रहातात अथवा काष्ठामध्ये जसा अग्नि रहातो किंवा मातीमध्ये जसे अव्यक्त घट रहातात त्याप्रमाणे जागत असलेल्या आईबापाच्या गर्भाशयात ते निजल्यासारखे रहातात. ही त्याची मूछित अवस्था केवळ गर्भाशयांतच असते असें नाहीं तर अव्यक्तापासून निघणे, आकाशादि भाव, लिगशरीराचा आरंभ, चद्रादि- काच्या किरणात प्रवेश इत्यादि समयीही ते सर्व निजल्यासारखेच असतात. रामा, येथपर्यंत सर्वाची स्थिति व क्रम एकसारखाच असतो. पण प्रत्येक जीवाच्या जन्माचे निमित्त भिन्न भिन्न असल्यामुळे जन्मानंतर त्यांच्या जीवनचर्येतही विलक्षण भेद पडतो. पूर्वजन्मी मरेपर्यत अति विरक्त राहून लौकिक व वैदिक कर्मामध्ये शास्त्रे प्रवृत्त करीत असली तरी जो ती करीत नाहीं तो धीर पुरुष देवगर्भात अत्यत सात्त्विक जन्म घेतो व त्यात ज्ञानसपन्न होऊन जीवन्मुक्तासारखा उदार व्यवहार करतो. मला देवपदाचा अधिकार प्राप्त व्हावा या इच्छेने जो तदनुकूल कर्म अथवा उपासना यावजीव करतो तो मरणोत्तर पूर्वोक्त क्रमानेच देवयोनीत जन्म घेऊन, तोडण्यास योग्य असलेल्याही भोगपरंपरेला भोगलंपटतेमुळे न सोडता, स्वाधिकाराचेच रक्षण करीत रहातो. त्याला तमोयुक्त राजस- साविक ह्मणतात.