पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४६ बृहद्योगवासिष्ठसार. मैथुन-सर्गात दुसन्या व तिसऱ्या संघांचा अंतर्भाव होतो. दुसन्या संघांतील देव, गंधर्व, यक्ष इत्यादि प्राणी सात्त्विक असल्यामुळे त्यांस एकदाच उपदेश केल्याने प्रायः ऐश्वर्यादिकांचा लाभ होतो. पण तिसऱ्या सर्गातील मनुष्यादि प्राणी रजस्तमोग्रस्त असतात. त्यामुळे त्यांस सहस्रावधि प्रयत्नानी ज्ञान व ऐश्वर्य संपादन करावे लागते. पण या तीन संघांतील सर्वच प्राणी मुक्त होत नाहीत. कारण मुक्ति वैराग्य, चित्त- शुद्धि इत्यादि साधनानी प्राप्त होणान्या आत्मविषयक साक्षात्कारात्मक ज्ञानाने लभ्य असते. यास्तव त्यातील ज्याना साक्षात्कार होतो ते मुक्त होतात व बाकीचे भोग व ऐश्वर्य यात बुडून जातात. राघवा, या नियतीचे स्मरण ठेवून मानवानी दीर्घ प्रयत्नाने साधुसगम, सच्छास्त्र- श्रवण, इद्रियनिग्रह, मनोजय इत्यादि उपायाचा आरम करावा व फळ मिळेपर्यंत त्याचा सतत अभ्यास करीत रहावें. रामभद्रा, अनेक उपासनाप्रकार, यज्ञादि शुभ कर्मसघ व निपिद्ध कर्म- रूपी सकटें यानी भरलेली ही सृष्टि सर्गोन्मुग्व झालेल्या ब्रह्माचे ठायीं पूर्वोक्त संकल्पक्रमाने व्यक्त झाली आहे ५९. सर्ग ६०-ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेल्या व विशेषत बोधाम पात्र असलेल्या सात्विक जीवाचा देहप्रणाम, श्रीवसिष्ठ-रामा, याप्रमाणे भगवान ब्रह्मा समाधि सोडून उठला असता व त्याने सर्गव्यवस्था केली असता, हा जगत्-रूपी जीर्ण रहाट भापल्या नियत व्यवस्थेप्रमाणे चालू लागतो. मेलेले प्राणी हेच त्या रहाटाच्या माळेला बाधलेले मोघे आहेत आणि जीवित-तृष्णा हीच माळेची दोरी आहे. असो, अशा प्रकारचा तो रहाट मुरू झाला की, काही जीव ब्रह्मा- पासून निघून भवपजरात शिरू लागतात. काही त्यातून निघतात व काही त्यांतच रहातात. माराश, हे सत्पुत्रा, ब्रह्मामध्ये काहीं जीवसंघ सतत अग्नीपासून निघणाऱ्या ठिणग्याप्रमाणे उत्पन्न होतात. आणि काही उपाधीचा विलय झाल्यामुळे मुघुप्तीप्रमाणे विश्राति घेण्याकरितां प्रविष्ट होतात. जे समुद्रातील तरंगाप्रमाणे उत्पन्न होतात ते भवाकाशात प्रवेश करितात व ब्रह्माचे ठायीं आरोपित केलेल्या आकाशवायूशी, दुधाशी एकरूप होणान्या जलाप्रमाणे, मिळून जातात. पुढे अशाच क्रमाने इतर भूताशी मिळून ते प्राणवायूच्या अधीन होतात. म्हणजे त पूर्णपणे लिंगदेह-