पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ५९. उपेंद्र, इंद्र, पर्वत, सागर इत्यादिकांनी व्याप्त व पाताळ, द्यावाभूमी, दिशा, स्वर्गमार्ग इत्यादि छिद्रांनी संपन्न असलेली सृष्टिही निर्माण झाली भाहे. मी हा सर्व संकल्पच सर्वतः पसरला भाहे. पण त्यामुळे केव्हढा विक्षेप होत माहे हा! आता हा सर्व त्रास पुरे झाला. मी आतां आपला संकल्प सोडून शात होतो. रामा, भसा विचार व निश्चयही करून ब्रह्मा करपनारूपी अनर्थास सोडून स्वस्थ होतो. आत्मस्वरूप-अनादि-पर-ब्रह्माचे स्मरण करतो. स्मरण करितांच तो त्या परमात्म्यास प्राप्त होऊन सर्वतः भासमान, मानसरहित व शांत ( सप्तमभूमिकामय ) पदी सुखाने रहातो. अक्षुब्ध सागरासारखा तो निर्मम व निरहंकार झालेला मनीरूप चतुर्मुख शात स्वरूपात निश्चल रहातो. याप्रमाणे पुष्कळ काल निघून गेल्यावर, तो भगवान् एकाकार वत्ति ठेवण्याविषयींचा जो मिश्चय त्याला एकादे वेळी शिथिल करतो. त्यामुळे लागलीच त्याच्या मनात ससारभावना उठते. सुखदुःखयुक्त, शेकडो आशापाशांनी बद्ध व राग-द्वेष-भयाने आतुर झालेल्या संसाराविषयी विचार करताच त्याच्या मनात दुःखिताची करुणा येते. तो भूतांच्या ऐश्वर्याकरिता ( उत्कर्षाकरितां) महा-अर्थयुक्त विविध शास्त्रे करतो. ज्यामध्ये अध्यात्मज्ञान भरले आहे, वेद व वेदागे याच्या अर्थाचा संग्रह केला आहे, अशी पुराणादिक दुसरीही शास्त्रे, सर्व प्राण्याच्या मुक्तीकरितां, तो निर्माण करतो. त्यानतर पुनः त्या परम पदाचा आश्रय करून व आपत्तींतून पार होऊन तो शात व स्वस्थ होउन रहातो. जगाची चेष्टा पाहून व मर्यादा ठरवून कमलपीठस्थ ब्रह्मा पुनः स्वात्म्या मध्ये स्थित होतो. कदाचित् तो सकल्पशून्य यदृच्छेनें, केवळ लोकानुग्रहा- करिता, लोकाप्रमाणे व्यवहार करून दाखवितो; पण त्याच्यामध्ये कोण- त्याही वेळी वैषम्य नसते. तो सर्व वृत्तींमध्ये सम असतो. सागराप्रमाणे परिपूर्ण असतो. लोकानुग्रहार्थ तो केव्हां केव्हां जागतो. ___ असो; हे महामते, ही ब्राह्मी पुण्यस्थिति आहे. या सर्वोत्तम साविक स्थितीस ब्रह्मादि देवही प्राप्त होवोत. सृष्ट प्राण्यांचे उत्तम, मध्यम व अधम असे तीन संघ मानलेले आहेत. पहिला विधिसंघ, दुसरा सुरसंघ व तिसरा मानवसंघ. त्यांतील पहिल्या मानससर्गातील प्रजापतीस संपा उपौनेच सिद्धि प्राप्त होते. त्यास ज्ञान, योग व ऐश्वर्य भापोभाप प्राप्त होते.