पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४१ बृहद्योगवासिष्ठसार. पुराणप्रसिद्ध अशा आपल्याच दुसन्या शरीराची कल्पना केली. तो देव स्या पीडीभूत तेजापासून दिवाकर झाला व तो अद्यापि प्रत्यही उदय पावून जगाची रक्षा करीत असतो. त्या प्रभाजाल-मंडलाच्या मर्ये ज्याची दीप्त सुवर्ण कुंडलें आहेत, ज्याच्या पाशी ज्वालायुक्त भनी आहेत, ज्याचे विशाल अवयव ज्वालाप्रधान आहेत व ज्याने भाकाशमंडलाला भापल्या तेजानें भरून सोडलें आहे असा तो नारायण रहातो. त्यानंतर चतुर्मुख ब्रह्माने दिवाकरास उत्पन्न करून राहिलेल्या तेजाचे नऊ भाग केले, तेही त्याच्या संकल्पाने सर्व सिद्धिसंपन मरीच्यादि प्रजापती झाले. तेही जो जो संकल्प करीत तो तो पूर्ण झाल्याचे तत्काल पहात. अशा विलक्षण सामर्थ्यामुळेच त्यांनी देव, दानव, यक्ष, राक्षस, मानव, पशू, पक्षी इत्यादि नानाप्रकारच्या भूतगणांस निर्मिलें. त्यानतर मैथुनादि धर्मानें पुत्र-पौत्रादि सृष्टि त्यांच्याच संकल्पाने प्रवृत्त झाली. भूतांपासून भूतें होऊ लागली. त्यांनी वेदास आठवून यज्ञादि कर्मप्रवृत्ति केली. ब्रह्मदेवाने जगद्गृहांत मानवा- दिकाची मर्यादा केली. सारांश मनच, ब्राह्म शरीर घेऊन, या भूतसंततीनें व्याकुळ झालेल्या, समुद्र, पर्वत व वृक्ष यानी संपन्न असलेल्या, सत्यलोक- रूपी शेवटच्या शिखराने भूषित झालेल्या, मेरु, भूपृष्ठ, दिकुंज इत्या- दिकांनी मध्यभागी जटिल झालेल्या, सुख, दुःख, जन्म, जरा, व्याधि इत्यादिकांचा अनुभव घेणान्या व रागद्वेषाच्या योगाने उद्विग्न होणाऱ्या त्रिगुणात्मक सृष्टीला रचते. विरीचीच्या मनोरूपी हातानी पूर्वी जशी रचना केली होती तशीच ती भाताही दिसणे शक्य आहे. तात्पर्य या- प्रमाणे हा सर्व जगत्संबंधी मोह मिथ्या उद्भवला आहे. मनाच्या संकल्पा- पासून झाला आहे. संकल्पामुळेच सर्व जगत्किया उद्भवतात. संकल्पा- मुळेच नियतीचे पालन करणारे देव उत्पन्न होतात. पण इंद्रादिदेव व विरोचनादि असुर, आपापल्या उत्कर्षाकरिता मनुष्यादि प्रजाजनामध्ये क्रमाने धर्म व अधर्म याची वृद्धि करण्याचा प्रयत्न करितात. ते प्राण्याना सालिक, राजस व तामस वृत्तीत बलात्काराने प्रवृत्त करितात. त्यामुळे वध, बंध, जरा, जन्म इत्यादि सहस्रावधि केशांनी सृष्टि अतिशय पीडित होते ते पाहून कुलोद्भव ब्रह्मा कंटाळतो व असा विचार करू लागतो. मनः स्पंदनापासूनच केवल व्यष्टिजीवोपाधिभूत विचित्र चित्त उद्भवले आहे त्याचा उपभोगाकरितां ही विस्तीर्ण, अनेक व्यवहारविकारयुक्त, रुद्र