पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ स्थितिप्रकरण-सर्ग ५९. ६४३ गणि त्याची मोठा विश्वास धरतात त्या नररूपी गर्दभाचे दर्शनही नको. यांच्या शरीरांत पहावें तो इकडे केस व इकडे रक्त यांवाचून दुसरें काही नाही. पण अशा अमंगल स्त्रीशरीरानेंही जे संतुष्ट होतात ते मानव सून कुत्रेच असले पाहिजेत. सर्व भूमि मृत्तिकामय आहे. वृक्ष काष्ठमय पाहेत व देह मासमय आहेत. खाली भूमि व वर आकाश, मग सुखाच्या उपयोगी असें सारभूत यात काय आहे ? काही नाही. सर्व लोकव्यवहार द्रिये व विषय याच्या सबधानुसारी असतात. तत्त्वविवेक केला मसता ते पार नाहीसे होतात. विचार करीपर्यंतच ते रमणीय टतात. दिव्याच्या ज्योतीतून निघणाऱ्या काजळाप्रमाणे सर्व मुखाशेच्या शेवटी दुःख असते. मनासह सर्व इंद्रियाच्या क्रिया, इद्रि- गची शक्ति किवा विषय संपत्ति क्षीण झाली असता अवश्य नाश पाव- गान्या आहेत. विषयसंपत्तींचा सतत उपभोग घेऊ लागले असतां चीने तुडविलेल्या लताप्रमाणे त्या फार दिवस टिकत नाहीत. काता ही क्त-मासाची पुतळी आहे. पण मूढ त्या हाडाच्या मोळीलाच मोठ्या माने मिठी मारतात. बाबारे, हा सर्व कामाचा विलास आहे. तेव्हां तरकाला कवटाळावयास लावणाऱ्या त्याला पुरुषार्थ कसे ह्मणावे ? अज्ञाच्या संतोषाकरिता पाहिजे तर त्याला पुरुषार्थ म्हणा. कारण त्याला हे सर्व सत्य व शुचि वाटत असते. पण ज्ञान्याला त्याच्या योगाने कधीही संतोष होणार नाही. भोगतृष्णा, भोग न घेतला तरी, विषाप्रमाणे मूछित करते. मग प्रत्यक्ष विषय भोग घेतल्यावर काय विचारावें ! यास्तव, हे पीरा, भोगास्था सोड व स्वात्मैकगतीचे सेवन कर. अनात्ममय भावनेने चित्त जेव्हा उद्भवते तेव्हा हे असन्मय जगज्जाल होतें. ब्रह्मदेवाच्या मनाने पाचा आकार कल्पनेने बनविला आहे. श्रीराम-गुरुवर्य, अवातर सर्गामध्ये मन विरिचिभावास प्राप्त होऊन क्रमाने या जगाला असे स्थूलरूप (चतुर्विध भूतसमूहमय ) कसे करतें ? श्रीवसिष्ठ-रामा, पद्मज नावाचा तो प्रथम बालक गर्भ-शय्येवरून उठून 'ब्रह्मा' असा शब्द करूं लागला. म्हणून त्याला ब्रह्मा म्हणतात. संकल्पसमूहरूप व मनःकल्पित अशा त्याने संकल्पानेच पुढील व्यवसाय केला. त्याने प्रथम सर्व व्यवहारोपयोगी तेज निर्माण केले. त्याच्या त्या तेजांत चतुर्मुखाच्या शरीराकारानें स्थित असलेल्या मनाने तेजोमय व