पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरण-सर्ग ७. करून म्हणणे, एवढेच आपल्या हाती आहे, असे त्यास वाटते. पण असला पुरुप ग्राम्यपशुच होय. कारण पशूस धनी जेथे वाधील तेथे तो रहातो, जे ग्वाऊ घालील ते खातो, प्यावयास पाणी देईल तेव्हा तो ते पितो व गळ्यात, नाकात, किवा तोडात दोरी बाधून जिकडे नेईल तिकडे जातो. याचीही तीच अवस्था असते. श्वराने नरकात पाट- विले तरी वाहवा, इद्रपट दिले तरी वाहवा. स्वत वा यत्न व तदनुरूप इच्छा यास मुळीच महत्त्व नाही अशा मनुष्य-जन्मापेक्षा पश्वादि तिर्यक् योनीतील जन्म फार चागला. ईश्नर कर्मानुरूप फल देत असतो. त्यामुळे जीव जरी त्याच्या अधीन असला तरी त्याच्यावर बलात्कार होणे किवा त्यास न केलेल्या कर्माचा भोग भोगावा लागणे, मुळीच शक्य नाही, हे जरी खरे आहे, तरी देववादी आपणास अत्यत परतत्र मानितात. प्रयत्न कल्यास आह्मी स्वत इद्रही होऊ, हे तत्त्व ते जगदी विसरतात. ह्मणून त्यास वर पशूची उपमा दिली आहे. बाकी आज जरी दैववशात् आप- णास वाईट दिवस जालेले आहेत तरी म्वप्रयत्नाने आह्मी आमची स्थिति मुधारू, असे जे समजत असतील ते नरकातचसे काय, पण याहूनही जरी अधोगतीस गेले असले तरी त्यात काही दोप नाही तरमात् शास्त्रमर्यादा न सोडता सदाचरण कराये, ह्मणजे शम-दम-श्रवणादि रत्ने आपोआप मिळतात. त्याच्या प्राप्तीवाचून आत्म्याचा उद्धार कधीही होणार नाही. या सृष्टीत एकच अग्वड तत्त्व भरले आहे. त्यास सूक्ष्मदृष्टीने पहाणे यासा- रिखा पुरुषार्थ नाही हे गुहा ज्याच्या योगाने समजते त्या शास्त्राची व साबूची योग्यता अमर्याद आहे अनेक जन्माची परपरा हा एक दु साध्य रोग आहे. तो सर्व जीवास झालेला असून त्याच्यावर शास्त्रीय प्रयत्न हेच एक उत्तम औषव आहे व आत्मज्ञ सत ह त दणार वद्य आहेत यास्तव ज्यास या रोगाचा कटाळा आला असेल त्यानी त्या सज्जनाचे सेवन करून त्याच्या उपदेशामृताने अज, अजर व अमर व्हावे ६ सर्ग ७-या सर्गातही पौरुषाचेच प्राधान्य दृष्टात देऊन सिद्ध केले आह श्रीवसिष्ट--दाशरथे, मानसिक आ शारीरिक पीडा यानी रहित असलेले पुष्ट शरीर हे पुरुषार्थाचे पहिले साधन अहे. धनादि इतर सर्व साधने त्याच्यापुढे तुच्छ आहेत. यास्तव प्रथम शरीरा मदृढ कसे होईल, याचे चितन करावे. चांगला आचार, घागला विचार व ब्रह्मचर्य ही तीन